रायबाग : पत्नीचा धारदार चाकूने खून करून स्वतःही आत्महत्या केल्याची घटना रायबाग तालुक्यातील चिंचणी शहरात घडली आहे. आत्महत्या केलेल्या पतीचे नाव दर्याप्पा खोत व त्याच्या पत्नीचे नाव उषा खोत असे आहे.
या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार पती, पत्नी सुखाने संसार करत. पण पतीने नेमके कोणत्या कारणामुळे पत्नीचा खून केला व स्वतःही आत्महत्या केली. याचे कारण मात्र समजले नाही. या संदर्भात कुडची पोलीस स्थानकात प्रकरणाची नोंद झाली असून पोलीस याचा तपास करत आहेत.