खानापूर /प्रतिनिधी :उद्या होणाऱ्या मुस्लिम धर्मातील प्रवित्र अशा रमजान ईद साठी गोव्याहून नंदगड गावाकडे येत असताना कार दरीत कोसळून दांपत्यासह चार वर्षाचा बालक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. अपघातात जखमी झालेल्या मध्ये तोफिक नाईक रा. नंदगड व त्याचा चार वर्षाचा मुलगा हरीश नाईक यांचा समावेश आहे.
याबाबत मिळालेली माहिती ही तोफिक नाईक हे गोवा येथील कुपळी येथून उद्या होणाऱ्या रमजान ईद साठी स्वतःच्या नंदगड गावाकडे एका कार मधून येत असताना अनमोड घाटातील एका वळणावर त्यांचे कार वरील नियंत्रण तुटणारे कार रस्त्याकडेला जाऊन दरीत कोसळली. कार कोसळलेले ठिकाण अधिक खोलवर नसल्याने सुदैवाने कोणती जीवित हानी झाली नाही. कार मध्ये असलेले दांपत्य व चार वर्षाचा बालक यांना बरीच दुखापत झाली आहे. चार वर्षाचा बालक हरीश नाईक त्याच्यावर रामनगर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. तर तोफिक नाईक तसेच त्यांच्या पत्नी रुकसाना नाईक यांना थोडीफार अधिक दुखापत झाल्याने तोफिक यांना अधिक उपचारासाठी बेळगाव येथे पाठवण्यात आले आहे. दुपारच्या दरम्यान कार चालवताना झोप आल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे याबाबत रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बसवराज यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.