खानापूर : शहराची जागृत देवता व हलकर्णी फाट्याजवळ असलेल्या श्री मर्यांमा देवीच्या मंदिरात रात्री चोरीचा प्रयत्न उघडकीस आला. चोरट्यानी देवीच्या अंगावरील दागिने लांबवण्याचा अथक परिश्रम केला. पण त्यांना यश आले नसल्याचे दिसून आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती की, शनिवारी रात्रीच्या सुमारास चोरट्याने वनमाला हॉटेलच्या बाजूने असलेल्या दक्षिणमुख दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु दरवाजा तुटला नसल्याने दरवाज्याची वरची ग्लास तोडून टावर कडी काढून प्रवेश केला. त्यानंतर गाभाऱ्याचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो तोडता आला नाही. त्यामुळे खिडकीची ग्लास सोडून देवीच्या अंगावरील दागिने काठीच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला पण त्या चोरट्यांना यश आले नाही.
दरम्यान मंदिराच्या वायव्य कोपऱ्यात व्यवस्थापन कमिटीने ठेवण्यात आलेली तिजोरी फोडण्यात आली. मात्र त्या तिजोरीत चोरट्यांना काही सापडले नाही. केवळ देवीच्या जागृतीमुळेच हा चोरीचा प्रयत्न असफल ठरला आहे. देवीच्या अंगावर दागिने किरीट असे बरेचसे साहित्य आहे. पण ते चोरट्यांना काढता आले नाहीत. त्यामुळे चोरट्याचा प्रयत्न असफल ठरला आहे. सकाळी पुजारी पूजेसाठी आला असता तुरीची बाब लक्षात आली. त्यानंतर व्यवस्थापन कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून या घटनेबाबत पोलिसांनाही माहिती दिली आहे.