चंदगड: पाण्यात मौज मजा करताना बाप बुडत असल्याचे लक्षात येताच दोन मुलांनी बापाला वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. पण सिताफिने बाप वाचला, पण बापाला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन संख्या भाऊंचा बुडून मृत्यू झाल्याची घटना चंदगड तालुक्यातील हाजगोळी जवळ शनिवारी सायंकाळी घडली.
याबाबत मिळालेली माहिती की. हजगोळी येथील चाळोबा मंदिर परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या बेळगाव कॅम्प येथील खान कुटुंबियांवर काळाचा घाला पडला आहे. या दुर्घटनेत बुडालेल्या मुलांची नावे रेहान अल्ताफ खान (वय 15) आणि मुस्तफा अल्ताफ खान ( वय 12) अशी आहेत. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत पाण्यात शोधाशोध केली पण मृतदेह सापडले पुन्हा रविवारी सकाळपासून पाण्यात शोधाशोध केल्यानंतर दुपारी त्या दोन मुलांचे मृतदेह सापडले. घटनेची चंदगड पोलिसात नोंद झाली आहे.
चंदगड पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव कॅम्प येथील अल्ताफ खान आपल्या पत्नी व दोन मुलांसह शनिवारी दुपारी चारच्या सुमारास हजगोळी येथील चाळोबा मंदिर परिसरात गेले होते.
याठिकाणी तिलारी जलाशयाचे बॅक वॉटर असते. त्या पाण्यात त्यांचे वडील अल्ताफ यांचा पाय घसला आणि ते पाण्यात पडले .त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या दोन्ही मुलांनी धाव घेतली. तेही पाण्यातून पळत असताना अचानक पाण्याचा अंत न सापडल्याने दोन्ही मुले पाण्यात बुडाले. त्यांचे वडील सुखरूप बाहेर आले मात्र, त्यांची दोन्ही मुले बाहेर आली नाहीत त्यामुळे एकच खळबळ उडाली. सध्याकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत माहिती मिळताच चंदगड
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात शोधाशोध सुरू केली. पण अंधार आणि पावसामुळे शोधकार्यात अडथळा आला. त्यामुळे काल शोध थांबवला रविवारी सकाळ पासून पुन्हा शोध आला व दुपारी त्या दोन बालकांचे मृतदेह सापडले. या घटनेमुळे कॅम्प परिसरातील नागरिकात एकच शोकाकुल वातावरण पसरले आहे.