
खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी:

- गेल्या पंधरा दिवसांपूर्वी खानापूरहून गणेबैल कडे जाताना दुचाकीला झालेल्या अपघातात जखमी झालेल्या गणेबैल येथील त्या युवकाने अखेर मृत्यूची झुंज दिली. रवीवारी उपचाराअभावी त्या युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे गणेबैल गावातून हळहळ व्यक्त होत आहे.
- त्या दुर्दैवी युवकाचे नाव वैभव गुरव असे आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी गांधीनगर जवळ दुचाकी वरून पडून वैभव गुरव व त्याचा मित्र सुजल सातेरी गुरव हे दोघे जखमी झाले होते.
- या अपघातात वैभव च्या डोकीला जबर मार बसल्याने त्याला तातडीने खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बजरंग दल तालुका अध्यक्ष किरण अष्टेकर यांनी दाखल केले होते. सदर युवक बजरंग दलचे कार्यकर्ते असल्याने त्या ठिकाणी भाजपा युवा नेते पंडित ओगले यांनी उपस्थिती दर्शवून त्याच्यावर उपचारासाठी प्रयत्न करून बेळगाव येथे अधिक उपचारासाठी दाखल केले. पण वैभव वर उपचार झाला नसल्याने आज त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वैभव याला आई-वडील नसल्याने तो एकटाच होता. त्यामुळे घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.