- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- महिन्याभरापूर्वी चोर्ला चेकपोस्ट नाक्यावर कंटेनर मध्ये वेल्डिंगच्या साह्याने बॉक्स करून गोवा बनावटीची दारू त्यामध्ये भरून गुजरातला रवाना होणाऱ्या एका वाहनावर अबकारी खात्याने महिन्याभरापूर्वीच कारवाई केली होती. अशाच प्रकारे गोवा येथून पुन्हा बेळगाव मार्गे राजस्थानला जाणाऱ्या एका टेम्पोवर सुवर्ण सौध जवळ कारवाई करून 28 लाखाची दारू अबकारी खात्याने जप्त केल्याची घटना शनिवारी घडली.
- प्लायवूडच्या शीटनी भरलेला टेम्पो, पाठीमागून अथवा पुढून कुठूनही पाहिले तर टेम्पोत फक्त प्लायवूडच्या शीटच दिसतील, अशा रितीने तयार केलेल्या टेम्पोत पुढील बाजूस मात्र प्लायवूडपासूनच केलेला भलामोठा बॉक्स आणि यामध्ये लपवलेल्या लाखो रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात अबकारी खात्याला यश आले आहे. हे गोवा बनावटीचे मद्य असून याची किंमत सुमारे २८ लाख रुपये होते.
- गोव्यातून बेकायदेशीररीत्या मद्य येणे ही बाब नवीन नाही. परंतु, शनिवारी अबकारी कारवाई खात्याने जप्त केलेले मद्य सहजरीत्या सापडणे शक्य नव्हते. परंतु, अबकारी खात्याचे पोलिस अधीक्षक विजयकुमार हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून ते पकडले.
- टेम्पोत फक्त प्लायवूड भरलेले दिसत होते. त्यामुळे संशय घेण्यास जागा नव्हती. परंतु, उत्तरप्रदेशमधील बनारस येथील चालक वीरेंद्र याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने यामध्ये मद्य आहे पण ते कुठे आहे, हे माहिती नसल्याचे सांगितले. प्लायवूड हटवण्यात एक तास लागला.
- गोवा बनावटीचे मध या टेम्पोत आहे, इतकीच माहिती अबकारी पोलिसांनाही समजली. त्यांनी टेम्पो आणून अबकारी कार्यालयात लावला. शनिवारी दुपारी 11 च्या सुमारास जेव्हा टेम्पोतील प्लायवूड हटवण्यास प्रारंभ झाला. तेव्हा मद्य कुठेच दिसत नव्हते. मद्य आहे की नाही, असा संशय पोलिसांनाही येऊ लागला. कारण, ध्यम प्रतिनिधींना इतक्या मोठ्या प्रमाणात बोलावून मद्यच सापडले नाहीं. तर आपले हसे होणार, ही शंका अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना होती. त्यामुळे ते प्लायवूड बाहेर काढत होते. ते काढण्यासाठी तब्बल एक तास गेला.
- मद्य नेणाऱ्यांची करामत
- मागे दोन रांगेत पूर्ण टेम्पो भरून प्लायवूड भरले होते. जेव्हा बाहेरून वाहन पाहिले जाईल तेव्हा त्यामध्ये फक्त प्लायवूड दिसत होते. परंतु, हे सर्व प्लायवूड हटवून समोरच्या भागाकडे अबकारी पोलिस कर्मचारी गेले तेव्हा तेथील करामत पाहून पोलीसही अवाकू झाले. या ठिकाणी प्लायवूडचे चार इंची तुकडे कापून खालून वरपर्यंत बॉक्स बनवला होता. तब्बल चार फूट उंच व सहा फूट रूंद बॉक्स बनवून यामध्ये मद्याचे बॉक्स भरलेले दिसले. हे एकूण 208 बॉक्स असून याची किंमत 28 लाख रूपये होते.
- या कारवाईत 18 विविध प्रकारचे मद्य, बियर व व्हिस्की जप्त करण्यात आली. अबकारी खात्याचे अप्पर आयुक्त वाय. मंजुनाथ, सहआयुक्त शांती व फिरोजखान किल्लेदार, अबकारी सर्वोच्च उपायुक्त वनजाक्षी एम., यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारीचे अधीक्षक विजयकुमार हिरेमठ, उपअधीक्षक रवी देवस्थान मुरगोड, निरीक्षक रवींद्र होसळ्ळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
अनेक महिन्यांपासून वाहतूक ?
- टेम्पोतून बाहेर काढलेले प्लायवूड एकदम जुने असून ते हुबळी पासिंगचा हा टेम्पो गोव्याहून थेट खानापूरमार्गे न येता तो गोवा अळणावर ते धारवाडमार्गे बेळगावकडे येत असल्याची माहिती अधीक्षक विजयकुमार हिरेमठ यांना मिळाली. सदर टेम्पो धारवाडहून येत असल्याने पथकाने सुवर्णसौधजवळ सापळा रचला. या ठिकाणी पहाटे चारच्या सुमारास टेम्पो थांबवला.
- अनेक महिन्यांपासून वाहतूक ?
- टेम्पोतून बाहेर काढलेले प्लायवूड एकदम जुने असून ते खराब झालेले आहे. यावरून हा टेम्पो फक्त मद्य वाहतुकीसाठीच केल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण, पाठीमागे कायम भरलेले प्लायवूड व पुढील बाजूला बॉक्समध्ये मद्याचे बॉक्स ठेवण्याची व्यवस्था ही गेल्या अनेक महिन्यांपासून केल्याचा संशय आहे. कोणालाही मद्याचा संशय येऊ नये, यासाठी ही व्यवस्था मद्यवाह मुख्य संशयिताने केलेली आहे. परंतु, आता हा टेम्पो पोलिसांच्या हाती लागला आहे.
चालक कोठडीत, नेता वेगळा !
- याप्रकरणी अबकारी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर टेम्पो फक्त बेळगावपर्यंत नेण्याची जबाबदारी होती. येथून पुढे दुसरा चालक घेऊन जाणार होता, त्यामुळे हे मद्य आणि त्याचा म्होरक्या वेगळाच. असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे..