खानापूर : सोमवारी सकाळच्या दरम्यान एका बोलोरो व 407 टेम्पो मधून बेकायदेशीररित्या जनावरांचे मांस घेऊन जात असल्याचा स्वभावा पोलिसांना लागतात गोवा क्रॉस करंबळ नजीक कारवाई करून वाहनांसह दोघांना खानापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
बेकायदेशीर रित्या जवळपास 1700 किलो जनावरांचे माऊस दोन टेम्पो मधून घेऊन जात असल्याचा सुगावा गुन्हे विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गिरीश यांना समजतात त्यांनी पाठलाग करून दोन्ही वाहनाना अडून तपासणी केली असता त्यामधून जवळपास 1700 किलो मांस जप्त केले आहे. त्याची जवळपास 2 लाख 21 हजार रुपये किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी दोन वाहनासह दावलमलिक मुख्तार अहमद मुनुरकर (रा. अलानावर) तसेच अकिबअल्ताफ किनी (टिपू सुलतान नगर, पिरनवाडी) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा क्रमांक 165/2023 कलम कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा शिवकुमार बल्लारी यांनी नोंद केला आहे. पुढील चौकशी खानापूर पोलीस करत आहेत.