बेळगाव : कर्नाटक सरकारने धर्मांतर बंदी कायदा रद्द केल्याच्या विरोधात बेळगावात विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बेळगाव शहरात येणाऱ्या शिवापूर येथील काडसिद्धेश्वर मठाच्या स्वामीजींच्या गाडीला काकती-होनगा गावाजवळ अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला, तर स्वामीजी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की धर्मांतर बंदी कायदा रद्द केल्याच्या विरोधात बेळगावात विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी काडसिद्धेश्वर मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी आंदोलनात सहभागी होण्यासाठी बेळगावला येत होते.