खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर तालुक्याच्या लोंढा भागात सतत धार सुरू असलेल्या पावसामुळे पांढरी नदीसह परिसरातील नाल्यांना पाण्याचा पूर आला आहे. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातणाळी माचाळी या जंगल पट्ट्यात असलेल्या गावांना तिन्ही बाजूंनी असलेल्या नाल्यावर पूलाचा वेढा निर्माण झाल्याने या गावाला बेटाचे स्वरूप आले . गेल्या तीन दिवसापासून या गावाला जोडणाऱ्या तीनही संपर्क रस्त्यावर असणाऱ्या पांढरे नदीला जोडणाऱ्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक व संपर्क खोळंबला सातनाळी ,माचाळी या दोन्ही गावामार्गे लोंढ्याला जाणारा रस्ता गेल्या तीन दिवसापासून बंद त्यामुळे येथील दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे.
साकव पाण्याखाली: माचाळी ते लोंढा या गावांना जोडणाऱ्या नाल्यावर श्रमदानाने बांधण्यात आलेले साकवही पाण्याखाली गेले आहे नाल्यावर उभारण्यात आलेले साकव अर्थात आडी पुरात पाण्याखाली गेल्याने एका रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे तर दुसऱ्या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद होऊन लोंढा भागाशी अशी असणारा संपर्क तुटला आहे.
नाल्यावर पाण्याखाली गेलेली अडी..
गेल्या दोन चार दिवसापासून सुरू असलेल्या सतदार पावसामुळे या भागातही विजेचा लपंडाव सुरू असल्याने या भागातील नागरिक अंधाराचा सामना करत आहेत एकीकडे 2000 पाऊस त्यात संपर्क रस्ते तुटल्याने या दोन्ही गावच्या नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे त्यासाठी हॅस्कॉम विभागाने याची तातडीने दखल घेऊन या भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र गावकर तसेच या भागातील नागरिकांनी केली आहे.