खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांचे निवडणूक चिन्ह “हात” असून मतपत्रिकेवरील क्रमांक 1 नंबर आहे त्यामुळे उत्तर कन्नड मध्ये मतदारांच्या व दैवतांच्या आशीर्वादाने मिळालेला हा “1” नंबर उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात पहिल्या क्रमांकावरच राहणार यात शंका नाही यासाठी खानापूर तालुक्यातूनही मतदारानी मताधिक्य देऊन डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांना निवडून द्यावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिरजे यांनी केले, तालुक्यातील हडलगा येथे डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचारात कोपरा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सामाजिक कार्यकर्ते ईश्वर बोभाटे, राजू पाटील यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते ईश्वर बोभाटे म्हणाले, देश पातळीवर तत्व निष्ठा यावर अनेक वेळा राजकारणी चालतात. उत्तर कन्नडा लोकसभा मतदारसंघात 16 पैकी 10 निवडणुका काँग्रेस पक्षाने जिंकले आहेत. तर 6 निवडणुका भाजपाच्या पारड्यात आहेत त्यामुळे हा भाग काँग्रेसचा बालेकिल्लाच राहिला आहे. आज काँग्रेस सरकारने दिलेल्या गॅरंटी योजना अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या आहेत. शिवाय डॉक्टर अंजली ते निंबाळकर ह्या एक सुशिक्षित व तालुक्यातील उमेदवार असल्याकारणाने आपण आपल्या भागाचा खासदार बनवणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी राजकारण मतभेद आपलं परक बाजूला ठेवून केवळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी डॉक्टरांचे निंबाळकर या आपल्या भागाच्या खासदार म्हणून निवडून देण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे यासाठी येत्या सात तारखेला होणाऱ्या निवडणुकीत मतपत्रिका वरील क्रमांक एक वर असलेल्या डॉ.. अंजलीताई निंबाळकर यांच्या हात या चिन्हाला आपले मतदान देऊन भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी हडलगा गावातील अनेक मतदार नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते