कापोली: दि.१५ सप्टेंबर रोजी मराठा मंडळ कापोली हायस्कूलचे माजी सहशिक्षक श्री.संजीव वाटूपकर यांचा ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल कापोली ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कापोली येथील माऊली मंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. सत्कारमूर्ती श्री.संजीव वाटूपकर व सौ.शर्मिष्ठा संजीव वाटुपकर तसेच मान्यवर ,पाहुणे यांच्या हस्ते दीप्रज्वलन आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पंडित नेहरू कॉलेज बेळगावचे निवृत्त प्राचार्य श्री.रमेश गणपतराव देसाई यांनी आपल्या प्रस्ताविकात सर्व मान्यवरांची ओळख करून देऊन स्वागत केले व सरांच्या कार्याची माहिती सांगितली. तसेच रमेश गणपतराव देसाई फौंडेशन व कापोली ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थीच्यावतीने सत्कार केला शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाला अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक आणि समाजसेवक श्री संभाजीराव देसाई आणि प्रमुख पाहुणे खानापूर तालुका विद्यमान आमदार श्री. विठ्ठल हलगेकर उपस्थित होते.
प्रमुख वक्ते डॉक्टर घाळी कॉलेज गडहिंग्लजचे प्राध्यापक श्री.शिवाजीराव भुकेले होते. सरांचे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मातृभाषेसाठी केलेल्या कार्याचे त्यानी कौतुक केले. निःस्वार्थी आणि प्रामाणिकपणे केलेल्या सेवेचे फळ सरांना सामाजिक संस्था आणि शिक्षण विभागाकडून मिळालेल्या अनेक पुरस्कारावरून दिसून येते.
सक्षम आणि आत्मनिर्भर पिढी घडवण्याचे कार्य सरानी केलेय. त्यामुळे आज कापोली आणि परिसरातील माजी विद्यार्थ्यांकडून केला जाणार हा सत्कार समारंभ . सरांचे खानापूर ,बेळगाव परिसरातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमातील उत्तम आणि वैशिष्ठ्यपूर्ण निवेदन सरांची ओळख करून देते, असे वक्तव्य भुकेले यांनी आपल्या भाषणात केले.एक उत्तम गावरान कवी , निवेदक , साहित्यिक , आदर्श शिक्षक अशी नानाविध रूप सरांच्या अंगी आहेत.माचिगड – अनगडी येथे1997ला सुरू केलेल्या सुब्रह्मण्य साहित्य संमेलन खानापूर तालुक्यातील एकमेव साहित्य संमेलन सरानी सुरू केले. हे कार्य एखाद्या शिक्षकांसाठी आणि समाजासाठी खूपच आदर्शवत आहे. शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी सरानी खूप मोठा त्याग केला आहे. त्याचा प्रत्यय भव्य अश्या या समारंभात जमलेल्या जनसमुदायातून दिसते असे भुकेले यांनी सांगितले .
माचीगड येथील सुब्रह्मण्य साहित्य अकादमीचे अध्यक्ष श्री.बाबुराव पाटील आणि जी. एस. एस.कॉलेजचे प्राध्यापक श्री. भरत तोपिनकट्टी यांनी सरांना निवृत्तीच्या सदिच्छा दिल्या .
खानापूर आमदार श्री.विठ्ठल हलगेकर यांनी सरांच्या कार्याचा आढावा घेतला. सरांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य आणि आपल्या मैत्रीपूर्ण नात्याचा उलेख आपल्या भाषणात केला, तसेच निवृत्ती जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना श्री.संजीव वाटूपकर यांनी आपले मनोगत मांडले. प्रथमतः कार्यक्रमाचे आयोजक आणि उपस्थित सर्वाचे आभार मानले. संस्थेने दिलेल्या भाकरीचा पुनरुच्चार केला माजी अध्यक्ष नाथाजीराव हलगेकर आणि विद्यमान अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजु (हलगेकर) यांच्याबद्दल ऋननिर्देश व्यक्त केले. शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करताना आलेल्या अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव सरानी सांगितला.विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेऊन कार्य करत गेलो, असं सरानी सांगितलं.
मातृभाषेच्या प्रेमापोटी संमेलनाचा ध्यास घेतला आणि त्याचा वटवृक्ष झाला याचे समाधान असल्याचे सांगितले .शिकून गेलेले विध्यार्थी पुण्या ,मुंबई आणि इतर ठिकाणावरून येतात आणि ऋण व्यक्त करतात त्यातच आपले कार्य चांगले झाल्याचे वाटते अस त्यांनी सांगितले .अनेक अडचणींना सामोरे जात दुःखद प्रसंग विसरून चांगल्या गोष्टी करत गेलो त्यामुळे माणसे जोडली गेली .समोर असताना आणि पाठीमागेही लोक लोक चांगलं बोलतात हा आपल्यासाठी मोठा पुरस्कार असल्याचे सरानी सांगितले. विद्यार्थ्यांसोबत स्वतःलाही घडवत गेलो आणि त्यामुळेच चांगले कार्य करण्याची ऊर्जा मिळाली. सौाग्यवतीचाही या कार्यात मोलाचा वाटा आहे असंही सरानी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी खानापुरातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था,आप्तेष्ट ,मित्रमंडळी प्राथमिक शाळा,माध्यमिक शाळेच्यावतीने सरांचा सत्कार केला. मराठा मंडळ कापोली हायस्कूलमध्ये २८ वर्षे सेवा करून शाळेसाठी विविध सेवा सोलर सिस्टीम, साऊंड सिस्टीम, संपूर्ण शाळेला थ्री.डी. कलरप्रिंटर ,तिन्ही वर्गात प्रोजेक्टर या सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल सरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक पी. टी. मेलगे सहशिक्षक श्री.शाहू नांगणूरकर व सहशिक्षिका व इतर कर्मचारी यांच्या हस्ते हा सत्कार झाला.
याप्रसंगी कापोली ग्रामपंचायत अध्यक्षा श्रीमती नमिता देसाई आणि कापोली परिसरातील अनेक गावातील विध्यार्थी ,नागरिक ,खानापूर तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांचे. मुख्याध्यापक, सहशिक्षक गावातील सर्व माजी विध्यार्थी – विद्यार्थिनी , नागरिक,ग्रामस्थ,राजकीय नेते उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. एम. पी. गिरी यांनी केले आभार श्री.शाहू नांगनूरकर यांनी मानले.