Oplus_16778240
चापगाव /प्रतिनिधी : चापगाव येथील प्रवेशद्वार श्री सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने ट्रॅक्टर रिव्हर्स मारणे स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन चापगाव ग्रामपंचायत सदस्य व उद्योजक नागराज यळुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात ग्रामपंचायत माजी अध्यक्ष रमेश धबाले, भाजपा तालुका सेक्रेटरी मल्लाप्पा मारीहाळ, पत्रकार पिराजी कुऱ्हाडे, पंच कमिटीचे अध्यक्ष नारायण गोदी, ग्रामपंचायत सदस्य नजीर सनदी, मुकुंद पाटील, संजय बेळगावकर, मातृ धबाले, किरण कारेकर, अभी पाटील, मष्णू सुतार, परसराम निलेशकर अर्जुन पाटील वामन मादार, शिवाजी मादार, महादेव दळवी, सुरज पाटील, विलास धबाले, प्रवीण पाटील, शंकर दबाले नारायण जिवाई यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी अनेकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना रमेश धबाले यांनी मंडळाचे कार्य स्तुत्य असल्याचे गौरव उद्गार काढले माजी उपसभापती मल्लाप्पा मारीहाळ यांनी सार्वजनिक गणेश मंडळे का साजरी करावी, त्याच्यातून गावच्या एकोप्याला बळ मिळते याबद्दल विचार मांडले. पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांनी मंडळासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरते अशी मंडळे गावच्या विकासाचे पाऊल ठरते. विकासात्मक राबवलेली कामे ही भविष्यात प्रोत्साहन व प्रेरणा देणारे ठरतात. हा एक स्मरणात राहणारा ठेवा असतो. असे विचार मांडले. सत्कारमूर्ती विलास धबाले यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंडळाचे सचिव नागराज धबाले होते. कार्यक्रमात सूत्रसंचालन व आभार मशनू चोपडे यांनी मांडले.
सदर स्पर्धा मंगळवार दि. 2 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजल्यापासून दिवसभर सुरू राहणार आहे. या स्पर्धेसाठी विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 3000,2500,2000,1500 अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. तरी ट्रॅक्टर चालक स्पर्धकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 9886982979,9482173425 या क्रमांकाची संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.