
खानापूर:
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कै. पुंडलिक मामा चव्हाण सीमा सत्याग्रही नंदगड तसेच कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण यांच्या पत्नी कै. श्रीमती अन्नपूर्णा विठ्ठलराव चव्हाण यांची शोकसभा शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण सभागृहात बोलावण्यात आलेली आहे. तरी खानापूर तालुक्यातील समस्त मराठी जनतेने या शोकसभेला उपस्थित राहावे असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री गोपाळराव देसाई, माजी आमदार श्री दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष श्री मुरलीधर पाटील व निरंजन सरदेसाई आणि सरचिटणीस श्री आबासाहेब दळवी, समितीचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी केले आहे.