- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
- सीमा भागातील विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठात मोफत आणि सवलतीत प्रवेश दिला जाणार आहे. त्याबाबत मंगळवार (ता. १४ ) रोजी खानापूर येथील शिवस्मारक येथे सकाळी साडे दहा वाजता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा खानापूर तालुक्यासह सीमा भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरतर्फे सिमाभागातील विद्यार्थांसाठी राबविण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेंतर्गत मराठी भाषिक विद्यार्थांंना विज्ञान, वाणिज्य व कला क्षेत्रातील पदव्युत्तर शैक्षणिक अधि विभागातील प्रति शाखेत 10 टक्के आरक्षण देवून प्रवेश शुल्कात पूर्ण सवलत देण्यात आली आहे.बहुतेक विद्यार्थांचा अभियांत्रिकी शाखांकडे कल असतो पण आजच्या घडीला वाढती महागाई, ओढवलेली बेरोजगारी परिणामी कोलमंडलेला घरखर्च ज्यामुळे इच्छा असूनही खर्चिक शिक्षणामुळे पालकांची अपरिहार्यता विचारात घेवून निवडलेला पर्यायी शैक्षणिक मार्ग अन् त्यात भाषिक सक्ती या सर्व बाबी विचारात घेऊन शिवाजी विद्यापीठाची सीमाभागासाठी नेमलेली स्वतंत्र व्यवस्थापन समितीने पुढाकार घेऊन तांत्रिक विभागातील अभियांत्रिकीच्या अधिविभागांत 25 टक्केची प्रवेश शुल्कात सवलत दिली आहे तसेच सीमाभागातील 865 मराठी भाषिक
- गावातील विद्यार्थ्यांसाठी मोफत व सवलतीत प्रवेश योजनाजाहीर केली आहे. यामधील अनुदानित अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ आहे तर विना अनुदानित अभ्यासक्रमांसाठी २५ टक्के शुल्क सवलत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वस्ती गृहासाठीची पूर्णता फी माफ करण्यात आली आहे याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक व इतर विभागाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत याचा खानापूरसह सीमा भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि शिव स्मारक येथे वेळेत उपस्थित ररहावे असे आवाहन खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई व सर चिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे