- खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि गोरगरिबांची घरे जमीन दोस्त झाले आहेत सदर घरांचे सर्वेक्षणही झाले आहे प्रत्यक्षदर्शनी प्रत्येक गावामध्ये ग्राम लेखाधिकारी तसेच ग्रामपंचायतींच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून तहसीलदार कार्यालयात अहवाल ही पाठवला आहे. सदर पडझड झालेल्या घरांचा सर्वे करून जिल्हा पंचायत विभागाच्या अभियंत्यांनी तसे आवाहनही दिले आहेत. पण त्या पडझड झालेल्या घरांची अद्याप नुकसान भरपाई शासनाच्या वतीने देण्यात आली नाही. तालुक्यात विश्वकर्मा समाजातील सुतार लोहार यांच्या घरी व लोहार शाळा कडून मोठे नुकसान झाले आहेत. अनेकांना राहायला घर नाही अशी परिस्थिती असताना तातडीने पडझड झालेल्या घर मालकांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विनंती यापूर्वीही करण्यात आली होती. परंतु महिना उलटला तरी अद्याप बहुतांश लोकांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात आली नाही. संपूर्ण घर जमीन व्यवस्था झालेल्या मालकाला एक लाख वीस हजार रुपये देण्याची हमी लोकप्रतिनिधी तसेच मंत्र्यांनीही दिली आहे पण या संदर्भात अजून बऱ्याच लोकांना निधी मिळाला नसल्याने अजूनही ते पडझड झालेले बेघर आहेत. यासाठी तातडीने त्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार यांना करण्यात आली.
- त्याचप्रमाणे आमदार विठ्ठल हलगेकर यांनाही एक निवेदन सादर करण्यात आले. व या संदर्भात विश्वकर्मा समाजातील ज्या ज्या कुटुंबांची घरे पडग्रस्त झाले आहेत त्यांचा अहवाल घेऊन तातडीने तहसीलदारांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रवृत्त करावे अशी ही विनंती करण्यात आली.
- तहसीलदारांना निवेदन देताना तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील, विश्वकर्मा समाज विकास संघाचे अध्यक्ष जोतिबा सुतार व संघाचे पदाधिकारी विनोद कम्मार व श्रीरंग सुतार, विजयकुमार बडगेर , अनंत सुतार ,यशवंत सुतार , परशराम सुतार , गोपाळ सुतार , रामचंद्र सुतार , मशनु सुतार , कृष्णा सुतार, गणपत सुतार , नागेश कम्मार , शकर बडगियार , संजय सुतार , गजानन सुतार , प्रल्हाद सुतार , प्रकाश सुतार , मोहन सुतार , गंगुबाई सुतार , लक्ष्मी सुतार हे सर्व बांधव व भगिनी उपस्थित होते.