खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार देण्यासंदर्भात विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची व्यापक बैठक मंगळवार दि. 26 मार्च रोजी दु.2 वाजता कै. व्ही.वाय. चव्हाण सभागृह शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे तरी तालुक्यातील मराठी भाषिक समितीप्रेमी नागरिकांनी या बैठकीला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई,कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील,निरंजन सरदेसाई,सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे