खानापूर प्रतिनिधी ! खानापूर तालुक्यात गेल्या वर्षभरापासून शासनाकडे केवळ पाठपुरावा करण्यात वेळ गेला आता टप्प्याटप्प्याने विधानसभा मतदारसंघातील गावांना पिण्याच्या पाणी सुविधा बरोबर रस्त्याची कामे मार्गी लावण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. आज खानापूर तालुक्यात हाती घेतलेली निचरा पाणी योजना अनेक गावात राबवण्यासाठी कामाचा शुभारंभ हाती देण्यात आला. या योजनेतून गावा गावातील गटारीत साचणारी घाण निचरा करून ती स्वच्छ करण्याची ही योजना आहे ही यशस्वी रित्या राबवण्यासाठी प्रत्येक पंचायतीने व ग्रामस्थांनी कार्यरत राहावे असे विचार आमदार विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी खानापूर विधानसभा मतदारसंघातील विविध कामांसाठी 4 कोटी 13 लाखाच्या विविध कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. शुक्रवारी तालुक्यातील विविध गावात रस्ते व पाणी विकास कामांचा शुभारंभ शुक्रवार दि. 27 रोजी भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला . या विकास कामातून कणकुंबी ते चिगुळे या 2 किलोमीटर रस्त्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी कामाचा शुभारंभ करण्यात आला. पंचायत राज्य आणि निर्मल विभाग अंतर्गत पाणी निचरा योजनेतून 12 गावामध्ये घटक पाणी योजनेसाठी 2 कोटी 13 लाखाचा निधी अंतर्गत गोल्याळी येथे पाणी घटक योजनेसाठी मंजूर झालेल्या 10 लाख 19 हजाराच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यामध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी घटक योजना (एल डब्ल्यू एम) योजनेसाठी, गोल्याळी येथे 10.19 लाख, आमटे 11.00 लाख , कणकुंबी 9.00 लाख, पारवाड 9.26 लाख, नागुर्डा 8. 88 लाख, मोहिशेत 11.69 लाख, लोंढा 45.98 लाख, कापोली केजी 9.06 लाख, हलगा 10.39 लाख, घोटगाळी 8.92 लाख, बीजगर्णी 8.26 लाख, व इतर कामे धरून 4 कोटी 13 लाख 23 हजार रुपयांच्या, विकासात्मक कामांचा भूमिपूजन आमदार विठ्ठलराव हलगेकर च्या हस्ते शुक्रवारी दिवसभरात हाती घेण्यात आला आहे.
kanakumbi येथे झालेल्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे, लक्ष्मण झांजरे, मलाप्पा मारीहाल, सदानंद पाटील, भरमाणी पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्य व गावातील नागरिक, उपस्थित होते.