कृषी व शासकीय प्रदर्शनाची सांगता
तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतला लाभ
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
खानापूर, ता.८: आई-वडिलांनी आपल्या मुलावर चांगले संस्कार करणे गरजेचे असून संस्काररूपी फळच शेवटी उपयोगाला येते.तसेच मुलांनी सतत वाचनाकडे लक्ष दिल्यास आपल्या प्रगतीत कोणताही अडसर येत नाही. वाचनामुळे माणसाच्या जीवनशैलीमध्ये बदल घडून येतो असे उद्गार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रसिद्ध अभिनेते प्रसाद पंडित यांनी केले. ते आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार ता.८ रोजी शांतिनिकेतन येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.
शांतिनिकेतन पब्लिक शाळेच्या मैदानावर आयोजित कृषी मेळावा सांगता कार्यक्रमात ते व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे सचिव आर एस पाटील,सचिव प्रा मजूकर, महालक्ष्मी ग्रुपचे उपाध्यक्ष विठ्ठल करंबळकर, संचालक चांगाप्पा निलजकर, यल्लाप्पा तिरविर ,प्राचार्य स्वाती फाटक, प्रभारी गट शिक्षण अधिकारी अंबगी आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक व परिचय एम.डी सदानंद पाटील यांनी करून दिले. त्यानंतर विविध प्रसाद पंडित यांचा शाळेच्या वतीने श्रीफळ चाल देऊन गौरव करण्यात आला. शांतिनिकेतन पब्लिक शाळेच्या सृजन 2025 हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम दोन दिवस मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात ते प्रमुख व्याख्याते म्हणून निमंत्रित शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, शाळेतील मुलांनी वाचनाकडे लक्ष द्यायला पाहिजे. निरंतर वाचनामुळे मी एक चांगला वक्ता झालो एक नट झालो आणि आज आपल्यासमोर मी मार्गदर्शन करण्यासाठी उभा आहे. याचे कारण ही वाचन आहे. आई-वडिलांना आदराचे स्थान द्यावे. आई आपल्यावर किती प्रेम करते हे आजपर्यंत कुणालाच समजले नाही. आईचं काळीजची जाणीव आपल्याला असायला पाहिजे. भावनिक उद्गार करून मार्गदर्शन केले.
यावेळी शांतीनिकेतन शाळेचे विद्यार्थी सह महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महालक्ष्मी ग्रुप चे सर्व संचालक मंडळ सह शांतिनिकेतन शाळेचे शिक्षक वर्ग व कर्मचारी उपस्थित होते. तसेच सायंकाळी शांतीनिकेतन पब्लिक स्कूलच्या नर्सरी ते चौथी आणि पदवीपूर्व महाविद्यालयाचे नो स्नेहसंमेलन पार पडले . आणि गेल्या तीन दिवसापासून चालू असलेल्या कृषी शासकीय प्रदर्शनाची आज सांगता करण्यात आली. गेल्या तीन दिवसांमध्ये मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. कृषी प्रदर्शनाची सांगता. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या 63 व्या वाढदिवसाचे अवचित साधून सोमवारपासून तीन दिवस शासकीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याचा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला. तीन दिवसीय कार्यक्रमात दिवसभर अनेक मार्गदर्शन व्याख्याने, झाली. मंगळवार व बुधवार सायंकाळी चार नंतर शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या शालेय विद्यार्थ्यांचे भारदार सृजन 2025 सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात आभार मनीषा हलगेकर यांनी मांडले.