चापगाव/ प्रतिनिधी: चापगाव येथील श्री रमेश तुकाराम पाटील यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील दरवाजा तोडून चोरट्याने चोरी केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला आहे. चोरट्यांनी पाठीमागील दरवाज्यातून प्रवेश करून घरातील तिजोरी तोडली. व कपड्यांची ही नासधूस केली आहे. यामध्ये कानातील काही सोन्याचे मनी, रक्कम असा जवळपास आठ ते दहा हजारचा ऐवज चोरट्यानी लांबवला आहे.
रमेश पाटील यांचे घर यडोगा रस्त्यावर गावच्या बाहेर आहे. ते त्या ठिकाणी वास्तवात असतात. परंतु शुक्रवारी सायंकाळी ते पाहुण्यांच्या घरी गेलेले पाहून चोरट्याने डाव साधला आहे. रात्रीच्या सुमारास पाठीमागील दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश करून तिजोरी फोडली व दुसऱ्याही एका खोलीतील कपडे वस्त्र, अस्तव्यस्त करून चोरट्यानी ऐवज शोधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु याच्यामध्ये तिजोरीत असलेले किरकोळ सोन्याचे मनी व काही रक्कम असा 8 ते 10 हजारचा ऐवज चोरट्यानी लांबवला आहे. विशेष म्हणजे ते रात्री घरी नसल्याचे पाहून चोरी झाल्याने जवळपासच्या माहित असलेल्या भुरट्या चोरानेच प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदर घटनेची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून नंदगड पोलिसांनी येऊन पंचनामा केला आहे. अलीकडच्या काळातील हा चापगाव गावातील दुसरा प्रकार असून महिन्याभरापूर्वी जळगे रोडवरील रोशन पाटील यांच्या घरातील अशाच प्रकारे चोरी झाली होती.