चापगाव / प्रतिनिधी: गुरुवारी दुपारच्या दरम्यान गावात पिना, टाचणी विकण्याच्या बहाण्याने फिरणाऱ्या संशयीताकडून घरफोडीचा प्रकार चापगाव येथे घडला आहे. सदर चोरट्याकडून घरचा दरवाजाची कडी तोडून प्रवेश केला. पण सुदैवाने त्याच्या हाती काही लागले नाही. पण त्या संशयित चोरट्याची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
याबाबत हकीकत की, चापगाव येथील जळगे रोडवर असलेल्या डॉ. रोशन मनोहर पाटील यांच्या घरात हा प्रकार घडला आहे. गुरुवारी दुपारच्या दरम्यान गावात पिना, टाचणी, गॅस रिपेरी करण्याच्या बहाण्याने फिरणाऱ्या एका अनोळखी युवकाने डॉ.रोशन पाटील यांच्या घरासमोर जाऊन घरात कोण आहे का? घरातील काकू कुठे गेल्या आहेत, दुपारपर्यंत घरी येतील का, असे अनेक प्रश्न त्या संशयिताने चौकशी केली. पण कोणीतरी उपचारासाठी डॉक्टर कडे आला असावा, अशा अंदाजाने घरात कोणी नाही सगळे बेळगावला गेले आहेत. असे त्या ठिकाणी असलेल्या रोशन पाटील यांचे सासरे कल्लाप्पा जिवाई यांनी सांगितले.व तेही तिथून आपल्या गावातील घराकडे निघून गेले. त्यानंतर त्या संशयित चोरट्याने घर परिसरात काही काळ गिरट्या मारत अंदाज घेतल्याचे निदर्शनाला आले. पण त्याच्यावर कोणताच संशय आला नाही. दुपारनंतर रोशन पाटील हे आपल्या घराकडे आले असता घरचा गेट व दरवाजाची कडी तोडल्याचे निदर्शनाला आले. चोरट्याने घरातील काही साहित्य अस्तव्यस्त पसरले. काही महत्त्वाचे साहित्य,ऐवजही होते.पण त्या चोरट्याच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे रोशन पाटील यानी सुटकेचा निस्वास सोडला. पण त्याची इतरत्र शोध केली व शिवाजी चौकात असलेल्या राज सुपर मार्केट मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तपासणी केली असता.दुपारच्या दरम्यान त्या फिरत असलेल्या संशयीतानेच घरफोडी केल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे. कारण घरासमोर चौकशी केलेल्या त्या संशयीताची छबी अलगदपणे त्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सदर संशयीत जळगा रोडवर दुपारच्या दरम्यान जात असल्याचे दिसून आले आणि त्याची छबी कल्लाप्पा जिवाई यांनी ओळखली. त्याच युवकाने घराकडे जाऊन चौकशी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्या युवकानेच घरफोडी केल्याचा दाट संशय निर्माण झाला आहे. यासंदर्भात नंदगड पोलिसात सूचना करण्यात आली असून अशा गावात फिरणाऱ्या अनोळखी व्यक्ती संदर्भात आता सतर्क राहणे अत्यंत गरजेचे बनले आहे. गुरुवारी दिवसभरात सदर संशयित युवक गावात पिणे,टाचणी व गॅस रिपेरी च्या निमित्ताने फिरत होता असे समजते. अशा अनोळखी व्यक्तीपासून गाव परिसरातील नागरिकांनी सावध राहावे. असे आवाहन करण्यात येत आहे.