IMG-20230905-WA0277

फोटो : विजापूर : कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्याभेटी प्रसंगी आमदार विठ्ठल हलगेकर, प्रमोद कोचेरी व इतर.

खानापूर लाईव्ह न्युज/प्रतिनिधि;

  • संरक्षित वनक्षेत्र आणि हरित लवादाच्या निर्बंधामुळे दुपदरी रस्त्याचे काम हाती घेणे शक्य होणार नसल्याने चोर्ला महामार्गाचे रुंदीकरण केले जाऊ नये, त्याऐवजी या रस्त्याचे आहे त्याच साडेपाच मीटर रुंदीचे सिमेंटिकरण करण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. आज आमदार विठ्ठल हलगेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी विजापूर येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांची भेट घेऊन रस्ता कामातील तांत्रिक अडथळ्यांवर चर्चा केली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दिल्लीत झालेल्या बैठकीतील निर्णयाचीही अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याचा विकास केला जाणार असून दीड ते दोन महिन्यात या कामाला सुरुवात होणार आहे. रस्त्याच्या विकासाचे काम सुरू होईपर्यंत खड्ड्यांची आणि रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी सध्याच्या कंत्राटदारावर सोपवण्यात आली आहे.
  • खड्ड्यांमुळे वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन व्यवस्थीतपणे डागडूजी केली जावी आणि अपघात होणार नाही, याची दखल घेत आवश्यक उपाययोजना आखाव्यात, अशी सूचना आमदार हलगेकर यांनी केली. गोवा हद्दीतील चोर्ला ते साळखीपर्यंतच्या महामार्गावर अनेक धोकादायक वळणे असल्याने अपघात संभवतात, त्यामुळे कर्नाटक हद्दीपासून पुढील रस्त्याचे किमान दुपदरीकरण करावे, अशी मागणी गोवा सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. तथापि कर्नाटकच्या हद्दीतील रस्त्याचा जैसे थे अवस्थेत विकास होणार आहे. यावेळी गुंडू पाखरे, तुकाराम हुंदरे उपस्थित होते.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us