खानापूर लाईव्ह न्यूज/प्रतिनिधी: चेतन फाऊंडेशन बेंगळुरू कर्नाटक यांच्या वतीने अखिल कर्नाटक राज्य शिक्षक संघ संमेलन धारवाड येथे दि.18 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आलेले असून या संमेलनात राज्यस्तरीय आदर्श शाळा आणि राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
खानापूर तालुक्यातील अती दुर्गम भागात असलेल्या सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा चिखले या शाळेला राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे.त्याच बरोबर चिखले शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री एस डी मुल्ला यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी 2019 साली एकत्र येऊन माजी विद्यार्थी संघटना स्थापन केली.आणि दुसऱ्याच वर्षी 19 जानेवारी 2020 रोजी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आयोजित करून शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक देणगी जमा केली.त्या देणगीतून शाळेच्या मूलभूत सुविधा पुरविण्याचे कार्य हाती घेतले.त्या नंतर मागच्याच महिन्यात 14 जानेवारी 2024 रोजी शाळेचा अमृतमहोत्सवी माजी विद्यार्थी पुनर्मिलन सोहळा आयोजित करून माजी विद्यार्थी संघटनेने शाळेचा कायापालट केलेला आहे.गेल्या पाच वर्षात माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून जवळपास सहा लाख रुपये शाळेच्या विविध सुधारणेसाठी खर्च करण्यात आले.आणि आपली शाळा सुशोभित करण्याबरोबरच सैक्षणिक प्रगतीसाठी पुढाकार घेऊन आपल्या शाळेच्या प्रगतिकरिता !!एक दिवस आपल्या शाळेसाठी हा उपक्रम राबविलेला आहे.आपली शाळा खानापूर तालुका नव्हे तर कर्नाटक राज्यात आदर्श शाळा आहे.हे सिद्ध केले.
चिखले शाळेला राज्यस्तरीय आदर्श शाळा हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे जांबोटी, कणकुंबी पंचक्रोशीत तसेच खानापूर तालुक्यात शाळेचे आणि माजी विद्यार्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.