Home » मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या बेळगाव दौऱ्यावर; खानापूर मए समितीच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित आवाहन!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या बेळगाव दौऱ्यावर; खानापूर मए समितीच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित आवाहन!

file_0000000049208211b317a7f423b67515

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या बेळगाव दौऱ्यावर; खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून सांबरा विमानतळावर स्वागताचे आवाहन!

खानापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी बेळगाव दौऱ्यावर येत असून, त्यांच्या स्वागतासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांबरा विमानतळावर दुपारी 3 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भाजपच्या विशेष अभियानांतर्गत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बेळगाव शहरातील धर्मनाथ भवन येथे दुपारी ३.३० वाजता ‘लोकशाही वाचवा! अराजकता दूर करा!’ या विषयावर विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात लोकशाहीचे संरक्षण, देशाची सुरक्षा, विरोधकांकडून होणारा अपप्रचार आणि देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरोधात जनजागृती या विषयांवर चर्चा होणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बेळगाव भेटीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सांबरा विमानतळावर दुपारी 3 वाजता स्वागतासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

माजी आमदार दिगंबर पाटील, समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, चिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील आणि निरंजन सरदेसाई यांनी हे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याच्या निमित्ताने सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांकडेही लक्ष वेधण्याची संधी मिळणार का, याकडे सीमावासीयांचे लक्ष लागले आहे.

खानापूर लाईव्ह | खानापूर तालुक्यातील ताज्या बातम्यांसाठी

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us