IMG-20240923-WA0148

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: चापगाव येथील प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघ हे येथील शेतकऱ्यांचे आर्थिक स्तोत्र आहे. गेल्या 64 वर्षात या संस्थेला अनेक चढ उतार आले. 2015- 16 सालामध्ये या संस्थेवर युवा संचालक मंडळांची नियुक्ती झाल्यानंतर या संस्थेच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न हाती घेण्यात आले. संस्थेमध्ये 2015- 16 सालामध्ये केवळ 40 लाखाची पत होती, आज ती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या सहकार्यातून संचालक मंडळाने व्यवहारात पारदर्शकरित्या कामकाज हाती घेऊन ती 2.25 कोटी पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे संस्थेचा कारभार अलीकडे संगणकरीत्या पारदर्शक तसेच विविध योजनांचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे संस्थेचे माजी अध्यक्ष व व विद्यमान संचालक पिराजी कुऱ्हाडे यांनी सांगितले. येथील महावीर मंदिरात आयोजित सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन उदय पाटील होते.

या संस्थेचा आढावा देताना ते म्हणाले, संस्थेकडे सध्या 720 सभासद असून भाग भांडवल 17 लाख इतके आहे. गेल्या आर्थिक वर्षात 4 कोटी 30 लाखाची आर्थिक उलढाल करून या संस्थेने 2 लाख 28 हजार चा नफा मिळवला असल्याची माहिती दिली. या सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेच्या कार्यालयीन इमारतीत सुयोग्य फर्निचर करणे, गोडाऊनच्या पत्र्यांची रिपेरी करणे तसेच संस्थेच्या ठिकाणी असलेल्या एकूण जागेची चकबंदी करून कंपाऊंड घालण्यासाठी तरतूद करणे चा ठराव करण्यात आला. सोसायटीत सभासद असलेल्या एखाद्या सभासदाचे आकस्मित, अपघाती अथवा वृद्धापकाळाने निधन झाल्यास त्या व्यक्तीच्या मयतासाठी 1200 ची तातडीची मदत निधी देण्याचा सर्वानुमते ठराव करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांचे निवारण करण्यात आले. शेतकऱ्यांनी संस्थेत यशस्वी विमा योजना अपघात विमा योजना भरून लाभ घ्यावा. शिवाय वेळेत कर्ज परतफेड करून आपले खाते पारदर्शक करावे. व संस्थेकडे अधिकारी सातबारे उतारे जोडून आपली पत वाढवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले. संस्थेचे सचिव किरण कारेकर यांनी अहवाल वाचन केले. व आढावा मांडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात दीपप्रज्वलन ज्येष्ठ सभासद मारुती पाटील, शंकर धबाले, शंकर बेळगावकर, वसंत पाटील, माजी अध्यक्ष रमेश धबाले, बाबू घारसी, शिवाजी मादार, ज्ञानदेव पाटील आदींच्या हस्ते झाले. यावेळी खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या प्रधान कारदर्शीपदी नियुक्ती झाल्याबद्दल युवा कार्यकर्ते व माजी उपसभापती मारिहाल यांचा ग्रामस्थ कमिटीच्या वतीने श्रीफळ शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष पद्मांना हारोकोप, सिकंदर सनदी, डॉ एन एन यळगुकर, नारायण गोदी, इराप्पा मादार ,रमेश घार्शी,पांडुरंग पाटील, लक्ष्मी पाटील, लक्ष्मी अंबाजी, क्लर्क फोडू सनदी यासह गावातील सभासद भागधारक ग्रामस्थ उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us