चापगाव : येथील प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक येत्या 4 जानेवारीला होणार आहे. एकूण बारा जागा करिता सदर निवडणूक होणार असून यामध्ये कर्जदार सामान्य गटातून 5,एस सी गटातून 1, एस टी गटातून 1, महिला गटातून 2, ‘अ’ वर्ग गटातून 1, ‘ ब’ वर्ग गटातून 1 त्याबरोबर बिन कर्जदार गटातून 1 अशा एकूण बारा जागा करिता निवडणूक होणार आहे या निवडणुकीत अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2025 आहे. 4 जानेवारी 2025 रोजी सकाळी 09 ते सायंकाळी चार पर्यंत मतदान प्रक्रिया होऊन त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.