खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
गेल्या 24 तासात खानापूर तालुक्यात पुन्हा धुवाधार पावसाला सुरुवात झाली आहे तालुक्याच्या जांबोटी भागात तसेच मध्यम भागात मोठा पाऊस सुरू असल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. करंबळ ते जळगा चापगाव या रस्त्यावरील करंबळ नजीक शिवारात, तसेच कारलगा हट्टी नजीक नाल्यावर सकाळी सात वाजल्यापासून पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. त्यामुळे चापगाव भागासी जोडणारी वाहतूक वाहतूक एक तर लालवाडी मार्गे तसेच यडोगा मार्गे सुरू आहे.