- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: बेळगाव जिल्हा पातळीवरील माध्यमिक शाळा अंतर्गत वार्षिक क्रीडा स्पर्धा सोमवारी रामदुर्ग या ठिकाणी पार पडल्या या क्रीडा स्पर्धेत मुलींच्या खो-खोमध्ये दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित चापगाव मलप्रभा हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन करून प्रथम क्रमांक मिळवला आहे त्यामुळे या हायस्कूलच्या विद्यार्थिनींची आता राज्य पातळीवरील खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे या त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
- दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मलप्रभा हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नंदगड विभागीय तसेच तालुका पातळीवरील मुलींच्या खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली होती. बेळगाव जिल्ह्यातील14 तालुक्यांच्या खोखो स्पर्धा रामदुर्ग या ठिकाणी सोमवारी पार पडल्या. यामध्ये जिल्ह्यातील अनेक मातब्बर संघांच्या बरोबर चापगाव हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी एकतर्फी विजय संपादन करत घवघवीत संपादन केले. मुलींच्या खो-खोच्या अंतिम सामन्यात चापगाव हायस्कूलच्या विद्यार्थिनींची सौंदत्ती तालुक्यातील संघाबरोबर कडवी झुंज झाली. यामध्ये सर्वच विद्यार्थिनी एकापेक्षा एक गुण घेत त्यांना पराभूत केले. व मुलींच्या खो खो मध्ये जिल्ह्यात अव्वल ठरले आहेत. त्यामुळे आता या हायस्कूलच्या विद्यार्थिनींची राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या अथक परिश्रमासाठी हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. बी. पाटी,ल शारीरिक शिक्षक पी. के चव्हाण, सहशिक्षक तुकाराम सनदी, नंद्याळकर सह शाळेच्या सर्व शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विशेषतः यडोगा, चापगावं येथील विद्यार्थ्यांचे पालक यांनी येथे जाऊन विद्यार्थ्यांना चांगलेच प्रोत्साहन दिले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव विक्रम पाटील सह पदाधिकारी तसेच चापगाव शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी व पालक वर्गातून त्यांचे अभिनंदन होत आहे.