खानापूर/वार्ताहर
चन्नेवाडी गावाला जाणाऱ्या रस्ता नादुरुस्त झाला आहे. कित्येक वर्षापासून आपल्या गावाचा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून अनेक अर्ज विनंती करून शासनाने किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधी देणे याकडे लक्ष न दिल्याने आता संतापलेल्या ग्रामस्थांनी श्रमदानाने व ग्रामस्थांतून वर्गणी काढून रस्ता बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
नंदगड-नागरगाळी रस्त्याच्या चन्नेवाडी क्रॉस पासून चन्नेवाडी गावापर्यंत सुमारे अर्धा किलोमीटरचा रस्ता नादुरुस्त झाला आहे. गावची लोकसंख्या सुमारे 500
पर्यंत आहे. गावच्या लोकांचा रोज हलशी,नंदगड, खानापूर बेळगावची संपर्क असतो. त्यामुळे या रस्त्यावरून येणार जाणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात आवाज उठवला प्रसंगी निवेदने दिली. पण कोणीच या रस्त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्रत्येक कुटुंबाकडून 500 रू. जमा करून या रस्त्यावर खडी व मोरम टाकून तात्पुरती दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी
रस्त्याच्या आजूबाजूला असलेला पालापाचोळा व गवत
जमा करून येथील स्वच्छता केली. यानंतर जेसीबी द्वारे सपाटी करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.आगामी आठवड्याभरात मुरूम व खडी टाकून रस्ता करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या आश्वासनावर राहण्यापेक्षा स्वतःची सोय स्वतःच करून घ्यावी यासाठीच हा आपला प्रयत्न असल्याचे मनोगत ग्रामस्थांनी व्यक्त केले.