Screenshot_20230626_091750

चंदगड: पोलीस तक्रारीत नाव घातल्याच्या रागातून चक पोलीस पाटीलचा कोयता व खुरप्याने डोक्यात व मानेवर सपासप वार करून ठार मारल्याची दुदैवी घटना पोवाचीवाडी, ता. चंदगड येथील देवचारंगी नावाच्या शेतात शनिवारी रात्री घडली. संदीप ज्ञानदेव पाटील (वय ४५) रा. पोवाचीवाडी असे मृत तरुण पोलिस पाटीलांचे नाव आहे.

याबाबत पोलिसाकडून व घटना स्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार शनिवारी २४ जून रोजी रात्री संशयित आरोपी रोहीत निवृत्ती पाटील यांच्याशी आपल भांडण सुरू असून त्याला समजावून सांगण्यासाठी सुरेश गुरव याने फोन करून पोलीस पाटील संदीप याला बोलावून घेतले त्यानुसार पोलीस पाटील संदीप हे गुरव यांच्या देवचारंगी नावाच्या शेतात संशयित रोहीत पाटील, निवृत्ती राजाराम पाटील, अरुण राजाराम व योगेश यांना समजावण्यासाठी गेले होते. पण जुन्या वादात आपले पोलीसअरुण पाटील यांना समजावण्या साठी गेले असता जुन्या वादात पोलिस तक्रारीत नाव घातल्याच्या रागातून त्यांनी संगनमत करून कोयता व खुरप्याने या हातावर डोक्यात व मानेवर सपासप वार करून ठार मारले. या घटनेमुळे परिसराराह चंदगड तालुक्यात खळबळ उडाली आहे. संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मयत यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार आहे. संशयित रोहीत व शांताराम आपा गावडा, रा. देनकांडगाव ता आजरा या नातलगात यापूर्वी भांडण झाले होते. यामध्ये रोहीत भावकीतील काही जणांच्या विरोधात चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यामध्ये मयत पोलिस पाटील संदीप यानेच आपले नाव तक्रारीमध्ये घातल्याच्या रागातून खून झाल्याचे घटनास्थळी बोलले जात असल्याचे समजते

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us