खानापूर:
खानापूर तालुका मतदारसंघ निवडणुकीसाठी 16 अर्ज दाखल झाले असून शेवटच्या दिवशी सहा अर्ज दाखल झाले आहेत. काहींनी दोन ते तीन अर्ज दाखल केल्याने ही संख्या 24 झाली आहे. एकूणच उद्या अर्जांची छाननी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच नेमके किती उमेदवार रिंगणात राहणार यावर तालुक्यातील राजकारणाचे बरेच चित्र दिसून येणार आहे.
गुरुवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. या अर्ज भरलेल्या मध्ये मुरलीधर पाटील (म.ए. समिती), के. पी. पाटील (शिवसेना), विठ्ठल हलगेकर (भाजप), डॉ. अंजली निंबाळकर (काँग्रेस), नासीर बागवान (जेडीएस), राजकुमार पुजारी (कल्याण राज्य प्रगती पक्ष ) तर अपक्षांत सुरेश देसाई (तोपिनकट्टी), इरफान अहमद तालीकोटी (खानापूर), बाबुराव देसाई (लोंढा), सोमनिंग धबाले (चापगाव), सिताराम सुतार (शिरोली), सुरेश पाटील (बेकवाड), यल्लाप्पा कोलकार (सुरापूर), रमेश मनवडर (संपगाव), लक्ष्मण बन्नार (तीर्थकुंडे), रुद्रगौडा पाटील (बेळगाव) यांचा समावेश आहे.
‘आप‘ उमेदवारी अर्ज पासून वंचित कर्नाटकातील बहुतांश विधानसभा क्षेत्रामध्ये हा पक्षाने आपली उमेदवारी दाखल केली आहे. पण खानापूर तालुक्यामध्ये ऐनवेळी झालेल्या उमेदवारी निवड प्रक्रियेतील गोंधळामुळे हा पक्षाची उमेदवारी दाखल होण्यास विलंब झाला. दोन दिवसापूर्वी आप पार्टीने गोरल नामक व्यक्तीला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे खानापुरातील सक्रिय आप कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला व आईने वेळी खानापुरातील कर्वेचे नेते दशरथ बनवशी यांना उमेदवारी देण्याचे घोषित केले पण ऐनवेळी उमेदवारी जाहीर केल्यामुळे कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यास त्यांना वेळ मिळाला नाही.त्यामुळे 2023 च्या निवडणुकीत खानापूर विधानसभा मतदारसंघात आप पक्ष उमेदवारी भरण्यापासून वंचित राहिला आहे.