खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
खानापूर शहराच्या ठिकाणी असलेल्या अनेक राष्ट्रीयकृत बँकांचे यापूर्वी विलीनीकरण झाले आहे. बँक ऑफ म्हैसूरचे, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विलीनीकरण झाले. त्यानंतर सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत रूपांतर झाले. पण आता कॅनरा बँकेच्या लीड बँकेने खानापुरात दोन शाखांची आवश्यकता नसल्याचे कारण पुढे करून खानापुरातील एक कॅनरा बँकेची शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक देसाई गल्ली मध्ये असलेली सिंडिकेट बँक (आत्ताची कॅनरा बँक) ही पूर्वीपासून असल्याने याच ठिकाणी नवीन कॅनरा बँकेचे विलीनीकरण होणे गरजेचे होते. परंतु तारारणी हायस्कूल कडील नव्याने झालेली कॅनरा बँक ही मुख्य बँक असल्याने याच बँकेत विलीनीकरण करावे लागणार असे वरिष्ठांचे नियम आहेत, तसे आदेशही वरिष्ठांनी दिले असल्याचे बँक व्यवस्थापकानी खानापूर लाईव्ह बोलताना सांगितले.
खानापुरातील कॅनरा बँकेची संबंधित असलेल्या दोन शाखा पैकी एक शाखा आता बंद करून तीही मुख्य कॅनरा बँकेच्या शाखेची जोडली जाणार आहे. त्यामुळे पूर्वीच्या सिंडिकेट बँक व आताच्या कॅनरा बँकेची सलग्न असलेल्या ग्राहकांची मात्र आता मोठी गोची होणार आहे.
खानापुरात गेल्या पंचवीस तीस वर्षापासून कार्यरत असलेल्या देसाई गल्लीतील सिंडिकेट बँकेचे 2021 मध्ये कॅनरा बँकेत विलीनीकरण करण्यात आले. पण आता त्याच विलीनीकरण करण्यात आलेल्या देसाई गल्लीतील या कॅनरा बँकेच्या शाखेचे मुख्य शाखा असलेल्या बेळगाव पणजी रोड वरील मराठा मंडळ ताराराणी हायस्कूलच्या कंपाउंड मध्ये असलेल्या कॅनरा बँक शाखेमध्ये विलीनीकरण केले जाणार आहे. त्यामुळे आगामी महिन्याभरानंतर देसाई गल्ली राम फोटो स्टुडिओ जवळ असलेल्या कॅनरा बँकेचे पूर्ण व्यवहार या बँकेच्या शाखेत होणार आहेत.
देसाई गल्लीतील या बँकेत अनेकांचे व्यवहार!
देसाई गल्ली या ठिकाणी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून कार्यरत असलेल्या सिंडिकेट बँक आताची कॅनरा बँक शाखेमध्ये चापगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील घरोघरी व्यवहार आहेत. याशिवाय खानापूर परिसरातील जवळपास 25 ते 30 खेड्यांचा व्यवहार या बँकेची संलग्न आहे. पण आता हीच बँक शाखा विलीनीकरण होणार असल्याने या सर्व ग्राहकांना शहरांतर्गत महामार्गावर ताराराणी हायस्कूल गेट जवळ असलेल्या कॅनरा बँकेच्या शाखेमध्ये करावे लागणार आहेत.
खरंतर, सध्याच्या परिस्थितीत देसाई गल्लीतील या कॅनरा बँकेच्या शाखेत नेहमी पुरेपूर गर्दी असते. कधी बँकेच्या पासबुकची तपासणी करणे किंवा रक्कम काढणे भरण्यासाठी अनेक व्यवहार आहेत. रोहयो अंतर्गत ग्रामपंचायत अनेक कामगारांचे पगार या बँकेत जमा होतात. त्यामुळे या शाखेच्या ठिकाणी नेहमी गर्दी असते. तासनतास ताटकळत राहावे लागते. पण आता हीच शाखा कॅनरा बँकेच्या मुख्य शाखेत विलीनीकरण झाल्यास त्या ठिकाणी अधिकच गर्दी होणार आहे. तसे पाहता ताराराणी गेट कडे असलेल्या कॅनरा बँकेच्या शाखेत अपेक्षित जागा नाही. त्यामुळे या बँकेचे विलीनीकरण झाल्याने त्या ठिकाणी मोठी भाऊ गर्दी होणार यात शंका नाही. यासाठी या देसाई गल्लीतील कॅनरा बँकेचे विलीनीकरण होण्यास विरोध होणे काळाची गरज आहे. यासाठी ग्राहक वर्ग सतर्क होईल का? ही चिंतेची बाब बनली आहे.
शहरातील बाजारपेठेवर होणार परिणाम ?
खानापूर शहरातील महत्त्वाचे शासकीय कार्यालय, बँका अलीकडे शहराबाहेर आल्या आहेत. यापूर्वी तहसीलदार कार्यालय व त्यांचे सर्व व्यवहार अर्बन बँक कडील जुन्या तहसीलदार कार्यालयात सुरू असायचे. त्यामुळे शहरात नेहमी वर्दळ असायची. पण तहसीलदार कार्यालय शिवस्मारक चौकाकडे स्थलांतर झाल्यानंतर या भागांमध्ये नेहमी शुकशुकाट दिसतो. शहराची बाजारपेठ महाजन कुटापर्यंत नेहमी गजबजलेले असते. पण त्याखाली देसाई गल्लीकडे कोणतेही शासकीय कार्यालय नसल्याने वर्दळ कमी असते. कॅनरा बँक शाखा त्या ठिकाणी असल्याने बँकेसाठी येणाऱ्या ग्राहकांची नेहमी गर्दी असल्यामुळे आजूबाजूच्या व्यवसायीकानाही याचा चांगला लाभ होत होता. पण आता हीच कॅनरा बँक विलीनीकरण होणार असल्याने या भागांत पुन्हा शुकशुकाट पसरणार व स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवहारहीवरही याचा मोठा परिणाम होणार आहे. यासाठी या भागातील व्यवसायिकासह या बँकेच्या ग्राहकांनी बँकेच्या विलीनीकरणास विरोध करणे अत्यंत गरजेचे आहे.
ಖಾನಾಪುರ ನಗರದಲ್ಲಿರುವ ಹಲವಾರು ರಾಷ್ಟ್ರೀಕೃತ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳನ್ನು ಈ ಹಿಂದೆ ವಿಲೀನಗೊಳಿಸಲಾಗಿತ್ತು. ಬ್ಯಾಂಕ್ ಆಫ್ ಮೈಸೂರು ಸ್ಟೇಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದೊಂದಿಗೆ ವಿಲೀನಗೊಂಡಿತು. ನಂತರ ಸಿಂಡಿಕೇಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಅನ್ನು ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಲಾಯಿತು. ಆದರೆ ಇದೀಗ ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್ನ ಲೀಡ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಎರಡು ಶಾಖೆಗಳ ಅಗತ್ಯವಿಲ್ಲ ಎಂಬ ಕಾರಣ ನೀಡಿ ಖಾನಾಪುರದ ಒಂದು ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಶಾಖೆಯನ್ನು ಮುಚ್ಚಲು ನಿರ್ಧರಿಸಿದೆ. ವಾಸ್ತವವಾಗಿ, ದೇಸಾಯಿ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿರುವ ಸಿಂಡಿಕೇಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ (ಈಗ ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್) ಈಗಾಗಲೇ ಇರುವುದರಿಂದ, ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಹೊಸ ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಅನ್ನು ವಿಲೀನಗೊಳಿಸುವುದು ಅಗತ್ಯವಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ತಾರಾರಾಣಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯಿಂದ ಹೊಸದಾಗಿ ರೂಪುಗೊಂಡ ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಮುಖ್ಯ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಗಿರುವುದರಿಂದ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ ನೊಂದಿಗೆ ವಿಲೀನವಾಗಬೇಕು ಎಂಬ ಹಿರಿಯರ ನಿಯಮಗಳಿದ್ದು, ಹಿರಿಯರೂ ಆದೇಶ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಬ್ಯಾಂಕ್ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕರು ಖಾನಾಪುರ ಲೈವ್ ಗೆ ತಿಳಿಸಿದರು.
ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿರುವ ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್ನ ಸಂಬಂಧಿತ ಎರಡು ಶಾಖೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದನ್ನು ಈಗ ಮುಚ್ಚಲಾಗುವುದು ಮತ್ತು ಅದು ಕೂಡ ಮುಖ್ಯ ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಶಾಖೆಯೊಂದಿಗೆ ವಿಲೀನಗೊಳ್ಳಲಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ಹಿಂದಿನ ಸಿಂಡಿಕೇಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮತ್ತು ಈಗ ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್ನೊಂದಿಗೆ ಸಂಬಂಧ ಹೊಂದಿರುವ ಗ್ರಾಹಕರು ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ಎದುರಿಸಬೇಕಾಗುತ್ತದೆ.
ಕಳೆದ ಇಪ್ಪತ್ತೈದು ಮೂವತ್ತು ವರ್ಷಗಳಿಂದ ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿರುವ ದೇಸಾಯಿ ಗಲ್ಲಿಯ ಸಿಂಡಿಕೇಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಅನ್ನು 2021 ರಲ್ಲಿ ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್ನೊಂದಿಗೆ ವಿಲೀನಗೊಳಿಸಲಾಯಿತು. ಆದರೆ ಈಗ ಅದೇ ವಿಲೀನಗೊಂಡ ದೇಸಾಯಿ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿರುವ ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಶಾಖೆಯು ಮುಖ್ಯ ಶಾಖೆಯಾಗಿರುವ ಬೆಳಗಾವಿ ಪಣಜಿ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಮರಾಠಾ ಮಂಡಲ ತಾರಾರಾಣಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯ ಕಾಂಪೌಂಡ್ನಲ್ಲಿರುವ ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಶಾಖೆಯೊಂದಿಗೆ ವಿಲೀನಗೊಳ್ಳಲಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಮುಂದಿನ ತಿಂಗಳ ನಂತರ ದೇಸಾಯಿ ಗಲ್ಲಿ ರಾಮ್ ಫೋಟೋ ಸ್ಟುಡಿಯೋ ಬಳಿ ಇರುವ ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕಿನ ಎಲ್ಲಾ ವ್ಯವಹಾರಗಳನ್ನು ಈ ಬ್ಯಾಂಕ್ ಶಾಖೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ.