IMG-20230807-WA0238

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:

दुचाकीवरून शेतवडीत गवत आणण्यासाठी नेहमीप्रमाणे रस्त्याकडेला लावून गेलेल्या एका शेतकऱ्याची मोटरसायकल अज्ञात जोडप्याने पळवल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चापगाव कारलगा दरम्यान मुख्य रस्त्यावर घडली आहे. सदर मोटरसायकल अज्ञातानी चोरून पळवल्याप्रकरणी नंदगड पोलीस स्थानकात दुचाकीच्या मालकाने तक्रार दर्ज केली आहे. सदर जोडपे प्रेमी युगुल कि चोरी करणाऱ्या टोळीतील जोडपे असा संशय व्यक्त केला जात आहे

याबाबत मिळालेली माहिती की, चापगाव -कारलगा दरम्यान कारलगा पासून काही अंतरावर चापगावच्या दिशेने असलेल्या नाल्यानजीक रस्त्याकडेला कारलगा येथील शेतकरी मारुती पवार यांनी आपली हिरो होंडा स्प्लेंडर KA 22 EN 1286 ही रस्त्याकडेला लावून गवत कापण्यासाठी शेतवाडीत गेले. दरम्यान 25 ते 30 वयातील एक अनोळखी जोडपे तिथून रस्त्याने घाई गडबडीत चालत जात असल्याचेही त्यांनी पाहिले. पण पवार यांनी याकडे दुर्लक्ष करत गवत कापण्यासाठी गेले. दरम्यान घाई गडबडीत मारुती पवार यांनी स्प्लेंडरची चावी गाडीला सोडून गेली होती. इकडे त्या अज्ञात जोडप्याने तो शेतकरी आडोशाला गेल्याचे पाहून मोटरसायकल घेऊन तिथून पोबारा केला. दरम्यान मोटरसायकल घेऊन जात असल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या काही गुराखीना लक्षात आले पण त्यांचेच कोणी नातेवाईक असतील असे समजून त्यांनी त्यांनाही अडवले नाही. पण नंतर गावात मोटरसायकल चोरीला गेल्याचा प्रकार कळताच त्या रस्त्याने चालत जाणाऱ्या त्या अनोळखी जोडप्यानेच ती मोटर सायकल पळवल्याचा संशय निर्माण झाला आहे. सदर दुचाकी पळवणारे ते अनोळखी जोडपेच होते की प्रेमीयुगुल होते, हे कळले नाही. मात्र ते कन्नड बोलत होते असे समजते. त्या अज्ञाताच्या विरोधात पोलिसात मात्र तक्रार नोंदविण्यात आली आहे. तसेच सदर क्रमांकाची दुचाकी कुणाच्या निदर्शनाला आढळल्यास त्यांनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us