खानापूर/ प्रतिनिधी: बैलगाडा शर्यत शेतकऱ्याचा छंद आहे. बैलजोडी ही शेतकऱ्याचा कणा तर दुसरीकडे शर्यतीच्या फडातील एक आवडीचा छंद मानला जातो. पूर्वीपासून शर्यतीच्या फडाना विशेष महत्त्व मानले जाते. पण अलीकडे शेतकऱ्यांच्या गोठ्यातील बैल जोड्या लुप्त होताना दिसत आहेत. वाढती महागाई व आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये बैल जोड्या कमी होत आहेत. त्यामुळे बैलगाड्या जोपासणे हे कमी होत असले तरी अनेक बैलजोडी मालकाना आपल्या गोठ्यामध्ये बैल जोड्या पाळण्यासाठी आजही झटतात. अशा शेतकऱ्यांचा कौतुक सोहळा म्हणजे शर्यतीचे होय. अशा शर्यतीचा शर्यत प्रेमी नागरिकांनी लाभ घ्यावा असे भाजप नेते व लैला साखर कारखान्याची व्यवस्थापक सदानंद पाटील यांनी व्यक्त केला. येडोगा येथील लक्ष्मी युवक मंडळाच्या वतीने २ ऑक्टोबर पासून या समितीच्या स्पर्धेला प्रारंभ झाला आहे . उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र खांबले उपस्थित होते.
प्रारंभी प्रा एन एम सनदी यांनी उपस्थित यांचे स्वागत केले. त्यानंतर विविध दैवतांच्या प्रतिमाचे फोटो पूजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, महालक्ष्मी ग्रुपचे संचालक चांगाप्पा निलजकर, तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील , गर्लगुंजी pkpsचे अध्यक्ष राजू सिद्धांनी, रमेश आंगिरकर पांडुरंग आधारे वासुदेव नांदुरकर, शंकर चौगुले आदींच हस्ते झाले. बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन लैला साखर कारखान्याचे एमडी व भाजप नेते सदानंद पाटील व हलकर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर चौगुले यांच्या हस्ते हित जपून व गाडा हाकून करण्यात आले. सदर शर्यत दोन दिवस चालणारा बुधवारी पहिल्या दिवशी उद्घाटन कार्यक्रम व काही मागच्या जोड्या जुंपण्यात आले. सदर शर्यत गुरुवारी दिवसभर लहान, मोठा दोन्ही गटांमध्ये चालणाऱ्या याचा बैलजोडी मालकांनी व शर्यत प्रेमींनी लाभ घ्यावा. असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरून भाजप नेते सदानंद पाटील, भरमानी पाटील, राजू सिद्धानी, चांगाप्पा निलजकर कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र खांबले आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर प्रकाश पाटील, अजित पाटील, उदय पाटील चापगाव अर्जुन सनदी लोकोळी, यल्लाप्पा गुरव , एन एम पाटील गंगाराम नीलजकर येडोगा , अनिल चिखलकर, तुकाराम सनदी, पिराजी कुऱ्हाडे,वाय के खांबले, संदीप अंधारे उपस्थित होते.
या शर्यतीमध्ये मोठ्या गटात विजेत्या बैल जोड्यांना अनुक्रमे 31000,25000, 21000, 18000 अशी 16 बक्षिसे ठेवण्यात आले आहेत तर बिनदाती गटात 11000, 9000, 7000 अशी पंधरा बक्षीस ठेवण्यात आली आहेत. तरी बैल जोडी मालकांनी तसेच शर्यत प्रेमींनी याचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र.8861471519, 9353008011 या क्रमांकाची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.