Screenshot_20230723_122951


जांबोटी /प्रतिनिधी: शेतवडीत काम करताना मलप्रभा नदीच्या पुराच्या पाण्यात बैल वाहून गेल्याची घटना कुसमळी नजीक रविवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली आहे.

जांबोटी कणकुंबी भागात जोराचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे मलप्रभा नदीलाही पुरेपूर पाणी आले आहे. अशातच शेतकऱ्यांची शेतीच्या रोप लागवड व हंबडन साठी मोठी लागवड सुरू आहे. अशातच हब्बनहट्टी येथील संतोष गणपती घाडी हे कुसमळी जवळील पिरणवाडी जांबोटी मुख्य रस्त्यावरील कुसमळी नजीकच्या ब्रिजच्या वरच्या बाजूला शेतात काम करून झाल्यानंतर बैलजोडी औता पासून सोडले. तेवढ्यात बाजूला असलेल्या नदीच्या पुराच्या प्रवाहात बैल वाहून गेला. लागलीच शेतकऱ्याने कुसुमळी ब्रिज वरून पर्यंत त्याचा पाठलाग करून शोधण्याचा प्रयत्न केला परंतु पूलाच्या मोठ्या प्रवाहातून शंकरपेटच्या बाजूने बैल वाहून गेल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनाला आले. मलप्रभा नदीला प्रवाहात मोठे पाणी असल्याने बैल बघता बघता वाहून गेला. बराच वेळ शोधला तरी बैल मिळाला नाही. अद्यापही काही शेतकरी मिळून मलप्रभा नदीच्या दुतर्फा काठावर शंकरपेटच्या बाजूला शोधाशोध करत आहेत अशी माहिती मिळाली आहे. पुराच्या प्रवाहातून खालच्या दिशेने कुणाला बैल निदर्शनाला आल्यास त्वरित कळवावे असे आवाहनही तेथील शेतकऱ्यांनी केले आहे. सदर बैलाची किंमत अंदाजे चाळीस ते पन्नास हजार रुपये असल्याचे कळते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us