Screenshot_20230907_225149

बुलढाणा: महाराष्ट्र बुलढाण्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. देऊळगाव राजा येथे दहीहंडीसाठी बांधलेल्या दोरीसह गॅलरी कोसळून झालेल्या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत दुसरी मुलगी जखमी झाली आहे. ही घटना आज रात्री आठच्या सुमारास शहरातील मानसिंग पुरा येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीसाठी बंद अवस्थेत असलेल्या एका घराच्या गॅलरीवर दोर बांधण्यात आली होती. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदावर चढले होते.

व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हा

दहीहंडी फोडताना बांधलेल्या दोरला युवक लटकले त्यावेळी सिमेंटच्या पिलरसह लोखंडी गॅलरी खाली कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत खाली उभे राहून दहीहंडी पाहणारी निदा रशीद खान पठाण (वय 9 वर्ष) ही चिमुकली जागीच ठार झाली. तर अल्फिया शेख हाफिज (वय 8) हिच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली. प्रथमोपचार नंतर अल्फिया हिला जालना येथे हलविण्यात आले. तर मृतक निदा पठाण हिस ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी हलविण्यात आले होते. जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीच्या कार्यक्रमात घडलेल्या या दुर्घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us