खानापूर: खानापूर तालुक्यातील हत्तरवाड येथे शेती काम करताना बैलाने मालकावरच हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली आहे.
बैलाच्या हल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव रामलिंग परशराम गावडा (वय 45) असे आहे. सदर शेतकऱ्याच्या पोटात बैलाचे शिंग घुसल्याने पोटातील अंतरे बाहेर आले आहेत. तातडीने सदर शेतकऱ्याला खानापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनास्थळी माजी आमदार अरविंद पाटील यांनीही धावती भेट घेऊन गंभीर जखमी शेतकऱ्यावर उपचार करण्यासाठी तसदी लावली.
परंतु पोटातील अंतडेच बाहेर पडल्याने त्यांना तातडीने शस्त्रक्रियेची गरज लक्षात घेता बेळगाव येथे पाठवण्यात आले.
रविवारी सकाळच्या सुमारास सदर शेतकरी परशराम गावडा हे आपली बैलजोडी घेऊन आपल्या डोंगरी कड असलेल्या शेतीकडे बैल जोडीला बैलगाडी जूपून गेला होता .शेतात बैल अचानक उधळल्याने त्याची धारदार शिंगे पोटात घुसली असे समजते.