खानापूर: बारावी बोर्डाच्या आज पासून परीक्षेला प्रारंभ होत आहे. पण परीक्षेपूर्वीच एका बारावी कॉमर्स मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.
मिळालेली माहिती की,खानापूर तालुक्यातील होनकल येथील चेतन रमेश तोराळकर (वय 18) हा विध्यार्थी खानापूर तालुक्यातील शांतिनिकेतन शाळेत कॉमर्स वर्गामध्ये शिकत होता. आज पासून बारावीची परीक्षा असल्याने गेल्या दोन दिवसापासून त्याच्यावर अभ्यासाचा ताण होता. उद्यापासून परीक्षा आहे. मी अभ्यास करतो, असे सांगून तो शेताकडून घरी आला पण रात्री त्याने आपल्या घरातील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनाला आले. रात्री घराकडे गेलेला मुलगा परत का आला नाही हे पाहण्यासाठी शेताकडे विटा मारण्यासाठी असलेल्या आई-वडिलांनी येऊन पाहिले असता त्याने घरात आत्महत्या केल्याचे निदर्शनाला आले. लागलीच सदर घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. खानापूर पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस कॉन्स्टेबल जगदीश व सत्यप्पा यांनी भेट देऊन पंचनामा केला. व मृतदेह शवविच्छेदनासाठी खानापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्याच्या पश्चात आई- वडील भाऊ, बहीण असा परिवार आहे. युवकाच्या दुर्दैवी निर्णयामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
खानापूर तालुक्यात युवकांचे आत्महत्या हा एक गांभीर्याचा विषय बनला आहे. गेल्या महिन्याभरात दोन ते तीन ठिकाणी आत्महत्या प्रकार घडले आहेत. पण आता पुन्हा या कॉलेज युवकांने आत्महत्या केल्याने युवकांच्या या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.