
खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी :
तालुक्यात चोरीचे सत्र पुन्हा वाढले! एकाच रात्रीत माडीगुंजीत, करंबळ, देवलती येथे गुरुवारी रात्री तब्बल 20 हून अधिक घरांचे कुलूप बंद दरवाजे तोडून चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. खानापूर तालुक्यात कुलूप बंद घरांचे दरवाजे तोडून चोरीच्या प्रकारात दिवसांनी वाढ होताना दिसते आहे. आंतरराष्ट्रीय चोरट्यानी खानापूर तालुक्यातील बंद घरांचे लक्ष चोरीचे प्रकार करण्याचा सपाटा सुरू केला आहे. गुरुवारी रात्री खानापूर तालुक्यातील तीन गावात चोरी झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे.
माडीगुंजी येथे 9 हून अधिक घरे लक्ष!
तालुक्यातील माडीगुंजी येथे एकाच रात्रीत जवळपास 9 बंद कुलूप घरे फोडून चोरी केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले आहे. माडीगुंजी येथील राजाराम कल्लाप्पा गुरव, निलेश प्रकाश केशकामत, रमेश देसाई, रमेश तमुचे, बाळू घाडी, महादेव करम्बलकर, पुंडलिक घाडी, जैतुबिन मुजावर अशी घरमालकांची नावे आहेत. यापैकी बहुतांश घरमालक परगावी राहतात. त्यामुळे त्यांच्या घरातील किती ऐवज व रक्कम चोरीला गेली आहे. याची माहिती उपलब्ध झाली नाही. उमेश तमुचे यांच्या घरातील काही ऐवज व रक्कम गेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. घटनास्थळी खानापूर पोलिसांनी जाऊन पंचनामा हाती घेतला असून उपरोक्त सर्व घरमालकांना एक बोलावून त्यांच्याकडून चौकशी केल्यानंतरच किती ऐवज व रक्कम चोरीला गेली आहे हे कळणार आहे. रात्री तीनच्या सुमारास चोरट्याने बाजूच्या घरातील दरवाजांना बाहेरून कडी लावून बंद कुलूप असलेले दरवाजे तोडून प्रवेश करून चोरीचा प्रकार केल्याचे निदर्शनाला आले आहे.
त्याचप्रमाणे देवलती येथे देखील रात्री तीन च्या सुमारास चोरीचे प्रकार घडले आहेत. यामध्ये तीन घरांना लक्ष वेधले आहे. त्यामध्ये बसवराज अक्की , राज शेखर कमार यांच्या बंद घराचे दरवाजे तोडण्यात आले आहेत शिवाय आणखी एक दोन घरांना चोरट्याने लक्ष वेधले आहे पण नेमका किती ऐवज गेला आहे. याची माहिती मिळाली नाही पोलीस तपास करत आहेत.
करंबळ येथे एकाच रात्रीत नऊ घरांचे लक्ष!
खानापूर तालुक्यातील करंबळ येथे देखील शुक्रवारी रात्री तीनच्या सुमारास एकाच वेळी जवळपास नऊ ते दहा घरांचे कुलूप बंद दरवाजे तोडून चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. करंबळ येथील जळगे रोडवर असलेल्या सरस्वती सातेरी पाटील यांच्या घराचा दरवाजा तोडून कपड्यात ठेवलेले 22 हजार रुपये चोरीला गेले आहेत. शिवाय हनुमंत जायाप्पा पाटील यांच्या घराचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत असताना जाग आल्याने चोरट्यानी तिथून पोबारा केल्याचे समजते. याशिवाय कुलूप बंद असलेले येथील दूध डेअरी, भैरू पाटील, विद्यानंद नार्वेकर, गुंडू रामचंद्र पाटील , आदींच्या घरांचे दरवाजे तोडून चोरीचा प्रयत्न झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा हाती घेतला असून पुढील तपास जारी केला आहे.