इटगी /प्रतिनिधी : खानापूर तालुक्यात दिवसेंदिवस विधानसभेची निवडणूक तापत चालली आहे. तालुक्यात प्रामुख्याने चौरंगी लढत दिसून येत असली तरी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल सोमनाथ हलगेकर यांचे पारडे दिवसेंदिवस जड होत चालले आहे. खानापूर तालुक्याच्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर भागाचा कानोसा घेतला असता तालुक्याच्या पूर्व भागात पारीश्वाड तसेच कक्केरी या दोन जिल्हा पंचायत क्षेत्रामध्ये यावेळी भारतीय जनता पार्टी उच्चांक साधणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे खानापूर तालुक्यात च्या पूर्व भागात असलेल्या अनेक मोठमोठ्या खेड्यात भारतीय जनता पार्टीला वन साईड वातावरण निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यापासून उच्च वर्गीय नागरिकातही भारतीय जनता पार्टीचे प्रतिबिंबल्याचे चिन्ह दिसून येत आहे. प्रारंभीच्या काळात उमेदवारी कोणाला मिळणार यावरून दोन गटाचे वातावरण निर्माण झाले होते. माजी आमदार अरविंद पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल हलगेकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन भाजपच्या प्रचाराला वेग आणला आहे. त्यामुळे आता तालुक्याच्या पूर्व भागात भाजपा सुसाट प्रचाराला वेग लागला आहे.
भारतीय जनता पार्टीचे अनेक सक्रिय कार्यकर्ते कामाला लागले असून चार ते पाच टीम करून प्रत्येक गावात घरोघरी दौरा करून प्रचाराला वेग घेतला आहे. आगामी चार-पाच दिवसांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्याच्या कन्नड पूर्व भागात काही माननीय नेत्यांच्या सभा घेण्याचा विचार ही भाजपाने हाती घेतला आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या उच्चांकी मतदानात तालुक्याचा पूर्व भाग अग्रस्थानी राहील असा दावा या भागातील भाजपचे कार्यदर्शी बसवराज सानिकोप, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते सुभाष गुलशेट्टी, संजय कंची, हनुमंत पाटील, सुनील मडीमनी, यासह अनेक कार्यकर्त्यांनी केला आहे.