खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर तालुक्याच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीचे आमदार तथा इतर पदाधिकारी कायम तत्पर आहेत. खानापूर तालुक्यात आगामी चार वर्षाच्या काळात विकासाची कामे राबवून तालुक्यांचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. भारतीय जनता पार्टीने पक्षाचा आमदार करून दिला आहे. कोणतीही शासकीय कामे एकाच वेळी होत नाहीत तर ती टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातात. गेल्या वर्षभरात झालेली विकास कामे देखील राज्य शासनाच्या मार्ग सूची प्रमाणे झाली आहेत त्यामुळे कोणीही याचे श्रेय घेऊ नये. मंजूर झालेली कामे ही झालीच पाहिजेत यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधी ही तितकेच जबाबदार असतात त्यामुळे होणाऱ्या कामांमध्ये कोणताही अडसर न येता टप्प्याटप्प्याने खानापूर तालुक्यातील कामे पूर्ण करणे नितांत गरजेचे आहे. खानापूर शहरात मागील भाजप शासन काळात मंजूर झालेली शासकीय इमारती या आज लोकार्पण करण्याची वेळ आली आहे. यासाठी राज्यातील परिवहन मंत्री, आरोग्य मंत्री सह जिल्हा पालकमंत्री व जिल्ह्यातील आमदार , खासदार यांची वंदनीय उपस्थिती राहणार आहे. दि. 12 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता होणारा हा लोकार्पण सोहळा यशस्वी करण्यासाठी खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या समस्त कार्यकर्त्यांनी, तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन खानापूर भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी आमदार अरविंद पाटील यांनी सोमवारी येथील विश्राम धामात बोलवलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला आमदार विठ्ठल हलगेकर, तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, प्रधानकार्यदर्शी बसवराज सानिकोप, गुंडू तोपिनकट्टी, माजी उपसभापती सुरेश देसाई, भाजप युवा नेते पंडित ओगले, माजी प्रधान कार्यदर्शी मारुती पाटील, यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, खानापुरातील नूतन बस स्थानक हे तब्बल 7 कोटी पस्तीस 35 रुपये खर्च करून उभारण्यात आले आह. या बस स्थानकाच्या निर्मितीसाठी गेल्या वीस वर्षापासून आजी-माजी आमदार आणि विशेष प्रयत्न केले आहेत. यासाठी खानापुरातील नागरिकांनी दिलेली साथ हे अमूल्य आहे. त्यामुळेच खानापुरातील हे नूतन बस स्थानक एक विकासाचे पाऊल म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यात शासकीय आरोग्य केंद्रासाठी मंजूर झालेले महिला आणि शिशु हॉस्पिटल हे देखील एक वैभव वाढवणारे असून यासाठी मागील शासन काळात 15 कोटीचा निधी मंजूर झाला होता. त्यातून सोसायटी इमारत झाले असून खानापूर तालुक्यातील रुग्णांसाठी ही अत्यंत सोयीच होणार आहे. त्याचप्रमाणे हेस्कॉम कार्यालयाचे नूतन इमारत याचेही उद्घाटन या अनुषंगाने होणार असून त्या कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातील समस्त नागरिकांनी व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन केले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल आदींनीही तालुक्यातील विकासा संदर्भात व होऊ घातलेल्या लोकार्पण सोहळ्यासंदर्भात माहिती दिली.