खानापूर/ प्रतिनिधी: खानापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचा अधिकृत उमेदवार कोण? याकडे भाजप कार्यकर्त्यांसह उमेदवारांच्या हितचिंतकात एकच ध्यास लागला आहे. भाजपचा उमेदवार कोण? आपल्याच नेत्याला उमेदवारी मिळणार का? असे अनेक प्रश्न सोमवारचा दिवस पूर्णतः चर्चेत गेला. त्यामुळे कधी एकदा भाजप उमेदवाराची यादी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
खानापुरातून अनेक मातब्बर नेते भाजपच्या उमेदवारीसाठी बेंगलोर, दिल्ली दरबारी तळ ठोकून आहेत. इकडे भाजपची अंतिम यादी करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांची कसरत सुरू आहे. ज्यांना उमेदवारी निश्चित आहे ते शांत आहेत. पण ज्यांना उमेदवारी नाहीच. त्यांना समजूतीसाठी दिल्ली बुलावा आला आहे.त्यामुळे कर्नाटकातील संपूर्ण अधिकृत यादी कधी प्रसिद्ध होणार, याकडे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रामुख्याने खानापूर तालुक्यात भाजप उमेदवारी वरुन बेटिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्ते टक लावून पाहत आहेत.
अशातच रविवारी सायंकाळी खानापूर शहर परिसरात विठ्ठल हलगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याची अंतर्गत माहिती मिळताच उत्साही कार्यकर्त्याकडून फटाक्यांचा जल्लोष अनेक ठिकाणी ऐकू आला. हे नवल नाही, कोणीही एका उमेदवाराच्या कार्यकर्त्याचा हा जल्लोष राहणारच. हा जल्लोष पक्षातील नेत्याविरुद्ध नसून विरोधी पक्षातल्याना दाखवण्यासाठी ही असू शकतो. पण याबाबत काही सोशल मीडियावर आकड पाकड शब्द लिखाण झाल्याने त्या कार्यकर्त्यांनी असंतोष व्यक्त केला आहे. आतिशबाजी करताना कोणाच्या भावना दुखावण्याचा प्रश्न येतोच कुठे? शेवटी राजकारण आहे, तडजोड ही करावीच लागणार? शेवटी इच्छुकासह कार्यकर्त्यांना भाजपच्या विरोधी पक्षासमोर निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. अन्यथा भाजप कार्यकर्त्यांची पुन्हा पाच वर्षे वाया जातील यात शंका नाही. असे भाजपच्या अनेक सुज्ञ नागरिकांचे मत आहे
भाजपच्या वरिष्ठांनी उमेदवारांची यादी सोमवारी सकाळी 11 पर्यंत जाहीर करण्याचे सांगितले होते. खानापूर सह बेळगाव मधील काही विधानसभा क्षेत्रातील उमेदवारी यादी निश्चितही झाली आहे.त्यात फेर बदल शक्य नाही. त्यामुळे अंतर्गत संदेश मिळाल्याने काहींनी आतिषबाजी केली असावी, हे जरी खरे असले तरी या संदर्भात ज्या नेत्याच्या समर्थनात आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांनीही कान पिचक्या देऊन सबुरीचा संदेश दिला आहे. त्यामुळे सोमवारी दिवसभर केवळ अधिकृत प्रसिद्ध होणाऱ्या यादीची वाट पाहण्यात अनेकांनी धन्यता मानली. उद्या किंवा परवा दिल्लीतूनच भाजपच्या उमेदवारीची घोषणा होणार आहे. त्यामुळे अति जल्लोषाचा विचार न करता निवडून आणण्यासाठी कामाला लागा असा आदेश इच्छुकांनी दिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनो ‘ सबुरी घ्या’ उमेदवारी ही तुमच्या मनातल्या व्यक्तीला मिळणार.
खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवार प्रामुख्याने विठ्ठल हलगेकर यांचे नाव आघाडीवर आहे, यात शंका नाही.त्याचबरोबर श्री अरविंद पाटील, प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई यांनीही आपल्या परीने प्रयत्न हाती घेतले आहेत. खरंतर श्री विठ्ठल हलगेकर हे गेल्या 2018 च्या निवडणुकीत केवळ तीन-चार हजार मतांनी निसटता पराभव झाल्याने त्यांनाच उमेदवारी निश्चित आहे. असे एकूण वातावरणावरून दिसून आले तसा अंतर्गत अहवालही बाहेर पडल्याचे चर्चेत आहे.पण कर्नाटकातील कोणतीच यादी किंवा उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर झाले नाही. त्यामुळे चर्चाही होणारच. यासाठी कार्यकर्त्यांनी थोडी सबुरी घ्यावी, तुमच्या मनातीलच उमेदवार जाहीर होणार यात शंका नाही.