खानापूर/ प्रतिनिधी: खानापूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री विठ्ठल हलगेकर यांचा उमेदवारी अर्ज आज जल्लोषी वातावरणात तसेच शक्ती प्रदर्शनाने दाखल करण्यात आला. दिवसभर झालेले जल्लोषी वातावरण एक चर्चेचा विषय ठरला आणि न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची ही भव्य रॅली भारतीय जनता पार्टीच्या इतिहासातील एक उत्साह आणि प्रेरणा देणारी ठरली. त्यामुळे खानापूर तालुक्यात आज दिवसभर एकच उत्साह आणि एकच नाव ‘…… विठ्ठल…… विठ्ठल हलगेकर अशीच चर्चा सुरू होती.

बुधवारी येथील शहरांतर्गत महामार्ग लगत असलेल्या श्री गणरायाला नतमस्तक होऊन या रॅलीला सुरुवात झाली. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जगतज्योती बसवेश्वर मूर्तीला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. श्री चौराशी देवी बाजार पेठ मार्गे, स्टेशन रोड मार्गे शिवस्मारकाचा रॅली दाखवून छत्रपती शिवरायाला अभिवादन करण्यात आले यावेळी जवळपास बारा हजार हून अधिक भाजपा कार्यकर्ते व समर्थ कार्यकर्ते उपस्थित होते. रॅलीमध्ये श्री विठ्ठल हलगेकर यांनी बैलगाडीतून रॅलीत सहभाग घेतला होता शिवाय सजवलेल्या वाहनातून जयघोष करत या रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी श्री विठ्ठल हलगेकर यांच्या समवेत कर्नाटक महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोले, गोवा भाजपा महिला मोर्चाच्या प्रमुख मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या धर्मपत्नी सौ.सुलक्षणा सावंत, खानापूर माजी आमदार अरविंद पाटील, प्रमोद कोचेरी, संजय कुबल, धनश्री सरदेसाई, सुरेश देसाई, ज्योतिबा रेमानी, यासह शरद केशकामत, किरण यळूरकर बसवराज सानिकोप,गुंडू तोपिनकट्टीसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. रॅलीची सांगता शिवस्मारक चौकात झाल्यानंतर तहसीलदार कार्यालयात निवडणूक अधिकारी श्रीमती अनुराधा वस्त्र यांच्याकडे उभे त्यांच्या हस्ते नामपत्र देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.


यावेळी बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या खानापूर तालुक्यात यावेळी भाजपा इतिहास रचणार आहे भाजपाचे सर्व नेतेमंडळ एकाच व्यासपीठावर आल्याने कार्यकर्त्यांचा निर्माण झाल्या असून आजची रॅली ही विजयाची नांदी ठरणार असल्याचे विचार व्यक्त केले यावेळी बोलताना गोवा राज्य महिला प्रभारी सुलक्षणा सावंत म्हणाल्या खानापूर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी या नामपत्र दाखल करण्याच्या रॅलीत दाखवलेला उत्साह आणि श्री विठ्ठल हलगेकर यांच्या प्रति दाखवलेला प्रेम भाव हा द्विगुणित असल्याचे विचार व्यक्त केले.


श्री विठ्ठल हलगेकर यांनी मांडली उपस्थितांची कृतज्ञता


खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी असलेला उत्साह कार्यकर्त्यांनी बांधलेली संघटनेची मूळ शिवाय तालुक्यातील सर्व वरिष्ठ नेते मंडळींनी एक दिलाने या निवडणुकीत सहभाग घेऊन माझ्या उमेदवाराला सहभाग दर्शवला आहे असाच सहभाग येत्या दहा तारखेला होणाऱ्या निवडणुकीत मतदान स्वरूपात करून निवडणुकीची पताका फडकवावी व तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी असेच सहकार्य सर्वांनी करावे अशी कृतज्ञता व्यक्त करून तालुक्यातील समस्त मतदार बंधू भगिनी व उपस्थित सर्व वरिष्ठ नेते मंडळी तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us