खानापुर: खानापूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल सोमांना हलगेकर यांनी आज 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी बेंगलोर निवासी माजी मुख्यमंत्री व भाजपचे जेष्ठ सर्वेसर्वा बी एस येडुरप्पा यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. त्याचवेळी त्यांचे सुपुत्र विजयेंद्रा या ठिकाणी होते.
विजयेंद्र यांना शिकारीपुर मधून भाजपाची उमेदवारी मिळाल्याबद्दल श्री विठ्ठल हलगेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. माजी मुख्यमंत्री बी.एस यडूरप्पा तसेच उमेदवार व भाजपचे युवा नेते विजयेद्र यांच्या समवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. यावेळी त्यांच्या समवेत अभिजीत चांदींलकर सह कार्यकर्ते उपस्थित होते.