बेंगलोर: कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांवर भारतीय जनता पार्टी कोणाला उमेदवारी देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पक्षाने अद्याप कोणतीही अधिकृत यादी जाहीर केली नाहीं. दिल्ली हाय कमांडच्या कोर्टात संभाव्य यादी दाखल झाली आहे. मात्र अधिकृत घोषणा नाही, पण इकडे कर्नाटकात सोशल मीडियासह काही चॅनल वाल्यांनी फेक यादी प्रसिद्ध करून इच्छुकासह कार्यकर्त्यात गोंधळाचे वातावरण निर्माण केले. येत्या दोन दिवसात पहिल्या टप्प्यात सत्ता स्थापनेसाठी निवडून येणाऱ्या महत्त्वपूर्ण उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.तर उर्वरित ठिकाणी गोंधळाचे वातावरण व अधिक स्पर्धा असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जाणारी यादी मध्ये तथ्य नसल्याचे राज्यातील काही वरिष्ठांनी ट्विटर द्वारे व्यक्त केले आहे.
2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (भाजप) देशाच्या दक्षिणेकडील कर्नाटकात सत्ता मिळवणे महत्त्वाचे आहे. आता राज्यातील भाजपच्या तिकीट इच्छुकांची यादी लांबली असून विविध ठिकाणी चुरशीची स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपची यादी ८ ऑगस्टला जाहीर होणार असल्याची माहिती खुद्द सीएम बोम्माई यांनी यापूर्वी दिली आहे
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीबाबत देशात नाविन्यपूर्ण मॉडेल अवलंबणाऱ्या भाजपतर्फे पहिल्या टप्प्यातील 125 उमेदवारांची यादी केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवण्यात आली आहे.
भाजप उमेदवारांची पहिली यादी ८ किंवा ९ तारखेला जाहीर होणार आहे. पुढील दोन दिवस राज्यात कोअर कमिटीची बैठक होणार असून, त्यानंतर यादी जाहीर केली जाणार आहे. पहिल्या यादीत गोंधळ नसलेल्या मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल आणि त्यानंतर दुसऱ्या यादीत गोंधळ असलेल्या मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे .
कार्यकर्त्यांची मते गोळा करून निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू आहे. यावेळी बनावट उमेदवारांची यादी फुटून भ्रष्ट मनाने राज्यातील जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडिया वर प्रसिद्धी केली जाणारी यादी अधिकृत असल्याचे भाजपा राज्याध्यक्ष नलीन कुमार पाटील यांनी ट्विटर द्वारे केले आहे.