ब्रेकिंग new…….
खानापूर /पिराजी कुऱ्हाडे
खानापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री विठ्ठल सोमांना हलगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातून भाजपचा अधिकृत उमेदवार कोण? ही आता प्रतीक्षा संपली आहे.
खानापूर तालुक्यातील श्री विठ्ठल हलगेकर यांच्यासह माजी आमदार अरविंद पाटील यांच्यात नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार, या चर्चेला बरेच उधान आले होते. दोन्हीही मातब्बर उमेदवार असल्याने अधिकृत उमेदवार कोण? याकडे संपूर्ण खानापूर तालुक्याचे लक्ष लागले होते. खरंतर माजी आमदार अरविंद पाटील यांनी म. ए. समितीला रामराम ठोकून भाजपच्या उमेदवारीवर भरोसा ठेवून भाजपात प्रवेश केला आहे. पण माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनाच उमेदवारी मिळण्याची साशंकता निर्माण झाल्याने माजी आमदार अरविंद पाटील यांचा जोर धरणे त्यांना अवघड झाले. तर इकडे श्री विठ्ठल हलगेकर यांचा 2018 च्या निवडणुकीतील निसटता पराभव तसेच त्यांच्या कार्याची पोचपावती लक्षात घेता भाजपातून त्यांनाच उमेदवारी मिळणार अशी जवळजवळ चिन्हे निश्चित झाली होती. पण अधिकृत उमेदवारीची प्रतीक्षा सर्वात लागून राहिली होती. ती आता अधिकृत उमेदवारी श्री विठ्ठल हलगेकर यांना जाहीर झाल्याने आता प्रतीक्षा संपली असून आता भाजपच्या इच्छुकासह सर्वांनी एकत्रित येऊन तालुक्यात पक्षाचा आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न होतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिल्ली येथे मंगळवारी रात्री 9 वाजता एका पत्रकार परिषदेद्वारे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकातील 189 विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.