बेंगलोर. ; चिकोडी तालुक्यातील हिरेकुंडी येथील जैन मुनि 1008 कामकुमार स्वामीजी यांच्या हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधितावर कारवाई करण्यात यावी तसेच तसेच राज्यात संत महात्मे व हिंदू कार्यकर्त्यांच्या वर होणारे अन्याय थांबवावेत, यासह विविध मागण्यांसाठी कर्नाटक भाजपा च्या आमदारांनी बेंगलोर विधान विधानसौद समोरील गांधीजींच्या पुतळ्यापासून राजभवनापर्यंत तीव्र मोर्चा काढून राज्यपालांना निवेदन देण्यात आले. माजी मुख्यमंत्री बसवराज मुंबई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, अभय पाटिल सह बेळगाव जिल्ह्यातील भाजप आमदारानी सहभाग घेतला होता.
माननीय राज्यपालना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन झाल्यापासून हिंदू मठ मठाधीश तसेच हिंदू कार्यकर्त्यांना सुरक्षितता राहिली देश संस्कृती जतनासाठी मठ मठाधीशांची संत महात्म्यांची अत्यंत गरज आहे पण अशाच मठाधीश यांना किंवा जैन स्वामीजीं सारख्यांची हत्या होत गेल्यास धर्माचरण राहील का यासाठी कर्नाटकात जैन स्वामी सह मताधिशांच्या सुरक्षिततेची सरकारने काळजी घ्यावी व अशा प्रकारे दोषीवर क** कारवाई करण्यात यावी असे निवेदन राजपलांच्याकडे केले आहे. निवेदनानंतर माजी मुख्यमंत्री बसवराज बॉम्माई यांनी कर्नाटक काँग्रेस सरकार सुरक्षिततेबाबत असफल ठरले आहे. असा आरोप करत दोषीवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.