खानापूर: तालुक्यात सध्या कृषी पतीन सहकारी संघाच्या निवडणुकांना उधाण लागली आहे. आतापर्यंत झालेल्या सात ते आठ कृषी पतीन सहकारी संघाच्या निवडणुकीत माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटांनीच वर्चस्व साध्य केले आहे. अशाच प्रकारे भरूनकी येथे चुरशीची निवडणूक झालेल्या कृषी पतीन सहकारी संघाच्या निवडणुकीत शनिवारी माजी आमदार अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील रयत विकास पॅनलने भरूनकीचा गड कायम राखला आहे. सत्ताधिकार्यांच्या विरोधात अनेकांनी अर्ज भरला होता. यामध्ये चुरशीची निवडणूक झाली, या निवडणुकीत रयत अभिवृद्धी पॅनलचे सामान्य गटातून कृष्णा देवांना पाटील, दत्तू हनुमंत पाटील, मंन्नेश देवाप्पा कुळकुंबकर, यल्लाप्पा परसाप्पा हिंडलकर, तर ब वर्ग गटातून महेश मुरलीधर पाटील , अ वर्ग गटातून मैनोदीन इमामसाब पाटील , एससी गटातून मारुती चन्नाप्पा बिडकर , महिला गटातून श्रीमती पुष्पलता पुंडलिक पाटील, लक्ष्मी नागेंद्र पाटील तर बिन कर्जदार गटातून नसीरहुसेन पाटील हे विजयी झाले आहेत.