खानापूर लाईव्ह न्युज/
खानापूर तालुक्यातील हलशी श्रीक्षेत्र जवळ असलेल्या भांबर्डा या गावात नव्याने श्री कलमेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार हाती घेण्यात आला असून या मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे. या मंदिराच्या बाजूला असलेल्या एक लहान श्री क्षेत्रपाल मंदिराचा ही जीर्णोद्धार कार्यक्रम न ग्रामस्थ पंच कमिटीने हाती घेतला असून या मंदिराचा भूमिपूजन येत्या रविवार दि. 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला आहे. मंदिराचे भूमिपूजन आमदार विठ्ठल हलगेकर माजी आमदार अरविंद पाटील सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग फोंडेकर राहणार आहेत.
जीर्णोद्धारित करण्यात आलेले श्री कलमेश्वर मंदिर,
या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 3 रोजी उद्घाटन कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी 7 वाजता सदगुरू प्रणित संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांचा हरिपाठ व संगीत जीवन विद्या कार्यक्रम व विश्व प्रार्थना होईल रात्री 8 ते 9 या वेळेत सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या संत शिषा प्रवचनकार सौ संगीता लक्ष्मण पाटील यांचे विचाराचे सामर्थ या विषयावर जाहीर समाज प्रबोधन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याचा सार्वजनिक आणि लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ कमिटी व जिर्णोद्धार कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.