खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: तालुक्यातील मनतुर्गा येथील ग्रामदैवत व पाटील घराण्यांचे कुलदैवत श्री नागेश महारुद्र मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प येथील पाटील घराण्याने हाती घेतला आहे. श्री नागेश महारुद्र हे पाटील घराण्याचे कुलदैवत मानले जाते. त्यामुळे गावातील जवळपास 85 कुटुंबातील पाटील बंधूंनी एकत्र येऊन या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प हाती घेतला असून या अनुषंगाने मंदिराचा भूमिपूजन यावर्षीचे हक्कदार (वार्षिक पुजारी) विलास गणपती पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
यावेळी गाव पंच कमिटीचे प्रमुख ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील, विशाल पाटील, नागेश सातेरी पाटील पंच कमिटीचे सेक्रेटरी नारायण आनंद पाटील यासह पाटील घराण्यातील कुटुंब प्रमुख उपस्थित होते. श्री नागेश महारुद्र या मंदिराला पुरातन इतिहास असून या देवस्थानला जागृत देवस्थान व नवसाला पावणारे देवस्थान म्हणून मांडले जाते. या मंदिराच्या पूजनाची जबाबदारी पूर्वापार येथील पाटील घराण्याने राखले असून या मंदिराच्या लहान असल्या जुन्या मंदिराला काढून त्या ठिकाणी नवीन मंदिर बांधणीचा संकल्प हाती घेण्यात आला असून याचा भूमिपूजन कार्यक्रम बुधवारी उत्साहात पार पडला.