खानापूर लाईव्ह न्यूज/ प्रतिनिधी:
बरगाव येथे बस थांबा निर्मितीसाठी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या बरगाव येथे मंजूर झालेल्या पाच लाखाच्या निधी अंतर्गत बस थांब्याच्या निर्मितीचा भूमिपूजन कार्यक्रम खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांच्या हस्ते करण्यात आला.
बरगाव येथे झालेल्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष चांगुना पाटील, उपाध्यक्ष, सदस्य काँग्रेसचे कार्यकर्ते प्रमोद सुतार, पी के पी एस चे अध्यक्ष कल्लाप्पा पाटील, सामाजिक कार्यकर्ते मल्लाप्पा कडोलकर, दोडापा कडोलकर, सुनिता पाटील, रजक धामणेकर, पंचायत अभिवृद्धी अधिकारी यशवंत घाडी आधी उपस्थित होते.
खानापूर तालुक्यात माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी 2022 23 या काळामध्ये आमदार निधीतून तालुक्यात जवळपास दहा ते बारा गावांना डिजिटल बस थांबा मंजूर केला होता यानुसार तालुक्यातील अनेक गावांमध्ये कामे पूर्णत्वाला आले आहेत अद्याप तीन ते चार ठिकाणी ही कामे अधुरी आहेत. नंदगड गावासाठी मंजूर झालेल्या बिडी रस्त्यावरील बस धाब्याचे काम ग्रामपंचायतीच्या अनियोजित पणामुळे अर्धवट होते पण आता तेही काम पूर्णत्वाला आले आहे. बरगाव या ठिकाणी देखील त्याच काळात पाच लाख रुपये मंजूर झाले होते त्या कामाचा आज खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ईश्वर घाडी व इतर मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली आहे.